हटके

त्याने सूप प्यायला नकार दिला आणि येथेच त्यांच्या प्लॅनिंग चे वाजले सूप

Spread the love

हैदराबाद / नवप्रहार मीडिया 

त्या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. पण महिलेचा पती त्यात अडथळा ठरत होता. तिने पतीचा मर्डर केला. आणि प्रियकराला पती भासवण्यासाठी तिने त्याच्या तोंडावर  अ‍ॅसिड टाकले. तिने पतीच्या कुटुंबीयांना तो तिचा पती आणि त्यांचा मुलगा असल्याचे भासवले. कुटुंबीयांनी देखील तो त्यांचा मुलगा असल्यावर विश्वास केला. त्याला प्लास्टिक सर्जरीसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले.  त्याला तेथे मटणाचे सूप देण्यात आले. पण त्याने तिला पिण्यास नकार दिला. आणि तेथेच त्यांचे बींग फुटले.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की , स्वाती आणि सुधाकर यांचे लग्न झाले होते. पण स्वाती चे राजेश नावाच्या तरुणावर प्रेम होते. त्यांनी सुधाकर ला वाटेतून हटवण्याचा प्लॅन आखला. आणि ठरवल्या नुसार त्यांनी 2020 मध्ये सुधाकर ची हत्या केली. सुधाकर च्या कुटुंबीयांना सुधाकर जिवंत आहे हे भासवण्यासाठी स्वाती ने राजेश च्य चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकले. सुधाकर आणि राजेश ची शरीरयष्टी सारखी असल्याने सुधाकर च्या कुटुंबीयांनी त्यावर विश्वास ठेवत राजेशलाच आपला मुलगा मनाने सुरू केले.

राजेश च्या कुटुंबियांकडून परवानगी घेत स्वाती ने त्याला प्लास्टिक सर्जरी साठी रुग्णालयात भरती केले. तेथे त्याला मटणाचे सूप देण्यात आले. पण त्याने तो शुद्ध शाकाहारी आहे हे सांगत मटणाचे सूप पिण्यास नकार दिला. ही बाब सुधाकर च्यां कुटुंबीयांना कळल्यावर त्यांचा संशय बळावला. कारण त्यांना राजेश क्या वागण्यावर पहिले पासून संशय होता. त्यांनी लगेच ही बाब पोलिसांच्या कानावर टाकली. आणि येथूनच स्वाती आणि राजेश क्या कृत्यावरून पडदा उठायला सूरवात झाली आणि स्वाती व राजेश सुधकरच्या खुनाच्या गुन्ह्यात पकडल्या गेले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close