हटके

बनावटी नोटा अन्  बनावटी बाबाचा पर्दाफाश

Spread the love

कोल्हापूर / नवप्रहार मीडिया

               विज्ञान प्रगती करत चंद्रावर पोहचला असला तरी देशात अजूनही काही मागासलेला भाग तर सोडा शहरात शिक्षित लोकं देखील अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे अनेक प्रकरणावरून पाहायला मिळत आहे. घटना घडल्या नंतर मात्र पोलिसांकडे तक्रार करण्यात येते. शहरातील उच्चभ्रू वस्तीत असाच प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पोलीस आणि अनिस चे कार्यकर्ता या भोंदूबाबा ला पकडुन देण्याच्या मनःस्थितीत होते. आणि आज ती वेळ चालून आली.

ऐन कोजागिरीच्या दिवशी कोल्हापुरात पंडित विनायक शास्त्री या भोंदू बाबाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी करणी करण्याचा सल्ला या भोंदू बाबांनी दिला होता. या भोंदूबाबाने करणी करण्यासाठी 60 हजारांची मागणी केली होती. पोलिसांच्या पैसे घेताना या बाबाच्या आवळल्या मुसक्या आवळल्या.अंनिसला गेल्या काही दिवसांपासून या बाबांचे कारनामे कानावर आले होत

त्यामुळे अंनिसच्या गीता हसूरकर आणि सीमा पाटील यांनीच ग्राहक बनून बाबांना गाऱ्हाणे घातले. शेतात करणी झाली असून ती काढण्यासाठी 65 हजार रुपये खर्च बाबांनी सांगितला. शिवाजी पार्क सारख्या अत्यंत उच्चभ्रू वस्तीत ठाण मांडलेल्या या बाबाचा रेटही तसाच उच्च होता. पण 65 हजारावरून बाबा मागे हटायला तयार नव्हता घासाघीस करून शेवटी 60 हजारावर तडजोड झाली.

त्यानंतर या बाबाने आज पौर्णिमेला येण्याचा सल्ला या दोघींना बाबांनी दिला. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांची याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मग सापळा रचला. त्यानुसार बनावट 60 हजाराच्या नोटा घेऊन या दोघी इथं पोहचल्या. त्यावेळी बाबाने शेतात एका खड्डा खोदायचा सल्ला दिला.

त्यानंतर गंडे दोरे देत बाबाने 60 हजार घेतले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि बाबांचे पितळ उघडे पाडले. ऐन पौर्णिमेच्या दिवशी बनावट नोटांनी बाबांची बनावटगिरी उघड झाली. पोलिसांनी या बाबाला ताब्यात घेतलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close