हटके

ये क्या  हो रहा  है बाबा ये क्या हो रहा है !  गुरू बना गुरु घंटाल

Spread the love

50 वर्षाचा शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीला घेऊन पळाला

गोंडा (युपी)/ नवप्रहार मीडिया                    

                  गुरू आणि शिष्याचे नाते हे वेगळेच असते. मनुष्याच्या जीवनात आई वाडीलांपेक्षाही गुरू चे स्थान हे उच्च असते. पण हल्ली हेच गुरू गुरू घंटाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुरू आणि शिष्यात आता गुरू शिष्याचे नाते न राहता काही नाते प्रेमात बदलत आहे. अनेक वयस्कर मुली त्यांनी स्वमर्जीने प्रेम केले हे मान्य करत असल्याने पोलिस आणि न्यायवेवस्था देखील हतबल होऊन बसते. शिकवणी घेणारा एक शिक्षक अल्पवयीन मुलीला घेऊन पळाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा शिक्षक या अल्पवयीन मुलीचा नातेवाईक आहे.

मुलगी घरातून फरार झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. शिक्षक आपल्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असून यामुळे समाजात आपल्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोपही मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशमधल्या गोंडा जिल्ह्यातील ही घटना आहे. शिक्षकाचं वय 50 वर्ष असून मुलगी अल्पवयीन आहे. मुलीने घरातून कॅश, दागिने आणि सर्व कुटुंबियांचे आधारकार्ड नेल्याचा आरोप पालकांनी केलाय. शिक्षकाने मुलीची फसवणूक करुन तिला पळवल्याचाही आरोपही पालकांनी केलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक हा मुलीचा नातेवाईक आहे. पोलिसांना या दोघांचा एक अश्लील व्हिडिओ हाती लागला आहे. आरोपी शिक्षकाच्या घरातल्या हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. पोलीस या व्हिडिओची तपासणी करतायत. आरोपी शिक्षक हा गावात ट्यूशन घेत होता. अल्पवयीन मुलगी या शिक्षकाकडे शिकवणीसाठी जात होती. शिक्षकाने या मुलीला भूलथापा देत आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यानतंर तिला घेऊन तो फरार झाला. पण फरार झाल्यानंतर मुलीचे अश्लील फोटो काढून तो गावाल्या लोकंना पाठवत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close