आरोग्य व सौंदर्य

घाटंजी न.प.प्रशासनाचे जनतेच्या आरोग्याबाबत उदासीन धोरण.

Spread the love

 

 

डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना जनतेच्या आरोग्या बाबत उपाययोजना मात्र शुन्य.

करवसुली होते जोमात आरोग्य सुविधा विषयक धोरण मात्र कोमात. सामाजिक कार्यकर्ते अनंत चौधरी यांची प्रतिक्रिया.

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार 

सध्या घाटंजी शहर व तालुक्यात डेंग्यूच्या आजाराचा व ताप डोकेदूखी यांसारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून प्रत्येक दवाखान्यात पेशंटची गर्दी वाढली आहे. घाटंजी न.प. प्रशासन यंत्रना मात्र जनतेच्या आरोग्या बाबत कुठलीही ठोस उपाययोजना करत नसल्याचे दिसून येते आहे.पावसाळा समाप्तीच्या वाटेवर असताना वातावरणात बदल होऊन मच्छर व कीटक वाढीस लागले असल्याने सोबतच घाटंजी नविन पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असुन अमृत योजना कामासाठी नाली खोदकामात वाढ पण,खोदकाम नंतर बूजवण्यात व्यवस्थित पणा नसल्याने सखल भागात नालीचे व ईतर पाणी साचून मच्छर वाढीस लागलेमूळे ही डेंग्यूच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. न.प. प्रशासन आरोग्य विभाग जनतेपासून कर आकारणी करतांना आरोग्य कर हक्काने घेते मात्र आरोग्या बाबत कुठलीही ठोस उपाययोजना किंवा जनजागृती करतांना दिसत नाही. नुक्तेच डेंगुच्या आजाराने घाटंजी येथे शिक्षण घेत असलेल्या पांढुर्णा येथिल तरुणीचा करुन अंत झाला.तसे झाल्याचे वृत्तही बातम्या व प्रसार माध्यमांनीवर प्रकाशित झाले त्यावर जनतेची हळहळ व्यक्त झाली. एवढं होऊनही घाटंजी न.प.प्रशासन व आरोग्य विभाग मात्र आरोग्या बाबत कुंभकर्णी धोरणात दिसून येते आहे.अख्खा पावसाळा लोटत आला तरी साधं मच्छर पळविण्याच्या धूराळणी चा एकही धूराळ घाटंजी शहरात झाला नाही. प्रशासन जनतेच्या आरोग्या बदल शुन्य उपाययोजना करत आहे. बाकी खाऊ कामाचे उद्घाटन व प्रचार प्रसार जोमात सुरू असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे. आरोग्या बाबत शून्यधोरण असलेल्या प्रशासनाने चालवलेल्या तुघलकी कारभाराला त्वरित आळा घालून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य जनजागृती व ठोस उपाययोजना करण्यात याव्यात ही मागणी आता सामाजिक कार्यकर्ते अनंत चौधरी सर यांनी केली आहे तसाच सुरू घाटंजी रहीवासी जनतेतून ही येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close