शैक्षणिक

एस ओ एस कब्स येथे येलो डे उत्साहात साजरा

Spread the love

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स मध्ये येलो डे मोठ्या आनंदात पार पडला. सर्व विद्यार्थी व शिक्षिका पिवळ्या रंगाच्या वेशभूषेत आले होते. विद्यार्थ्यानी टिफिन मध्ये पिवळ्या रंगाचे फळ , पराठा ,ढोकळा असे विविध खाद्यपदार्थ आणले होते. विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या वस्तू आपल्या सोबत आणल्या होत्या तसेच विद्यार्थ्यांना पिवळ्या रंगाबद्दल शिक्षिका पूजा मांडोकार यांनी माहिती दिली व पिवळ्या रंगाचे महत्त्व समजावून सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या के साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिता जोशी, रेणुका सबाने, हर्षिता श्रीवास ,वृषाली काळे ,हर्षदा ठाकरे , पूजा मांडोकार व सुप्रिया धोपटे यांनी अथक प्रयत्न केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close