नागरिकांनी ‘आयुष्यमान भव:’चा लाभ घ्यावा:खासदार अशोक नेते
गडचिरोली / तिलोत्तमा समर हाजरा
आपले आरोग्य उत्तम राहिले, तर आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष्यमान भव:उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह पंधरवाडा या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने गोकुलनगर येथील सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळेत महाआरोग्य तपासणी शिबिर, आयुष्यमान भारत व आभा कार्डची नोंदणी, वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात सेवा पंधरवाडा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. या सेवा पंधरवाडानिमित्ताने या महाशिबिराचा लाभ घेऊन नागरिकांनी आयुष्यमान भव: व आभा कार्डाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा, असे ते म्हणाले.यानिमित्त खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून महाशिबिराचा प्रारंभ केला.याप्रसंगी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोळ, विनोद देवोजवार, विवेक बैस, जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, डॉ. सीमा गेडाम, डॉ. शिल्पा कोहळे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, सोमेश्वर धकाते, देवाजी लाटकर, हर्षल गेडाम,आशीष रोहनकर, अरुण हरडे, दीपक सातपुते, संजय बारापात्रे, श्याम वाढई, निखिल चरडे, मंगेश रणदिवे, अनिल कुनघाडकर, जनार्दन साखरे, विलास नैताम, अंकुश कुडावले, पुष्पा करकाडे, शिल्पा भोयर, वच्छला मुनघाटे, नीता उंदीरवाडे, जनार्दन भांडेकर तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, आरोग्य कर्मचारीवृंद उपस्थित होते.
——————————–