राज्य/देश

वाचा कुठल्या कारणाने मराठा समाजात पसरतोय असंतोष

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया

                 सध्या राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रित आहे. राज्य सएकार काय निर्णय घेते आणि जरांगे पाटलांना तो मान्य आहे किंवा नाही या नंतर काय ते होईल . पण सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओने खळबळ माजली आहे.चला तर पाहू या काय आहे या व्हिडिओत.

 समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत मुख्यमंत्री  आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं,बोलून मोकळं व्हायचं.हो..  असे बोलतांना दिसत आहेत. हा व्हिडीओ राज्यभर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर मराठा समाजामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.सरकारला समाजाची दिशाभूल करणं महागात पडेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, सरकारला आपण एक महिन्याचा वेळ दिलेला आहे. त्यामुळे बोलून मोकळं व्हायचं की काय, ते बघू. जर हे सत्य असेल तर सरकारला समाजाची दिशाभूल करणं महागात पडेल.इच्छा नसतानाही आम्ही एक महिन्याचा वेळ सरकारला देत आहोत. त्यामळे तिघांनीही अशी विधानं करु नयेत,नसता समाजाची दिशाभूल करणं महागात पडेल,असा इशाराही दिला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close