न.प. शाळा क्रं.१ मधे वृक्षास राखी बांधून नारळी पौर्णिमा साजरी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार.
घाटंजी- ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या विषयावर गांभीर्यपूर्वक लक्ष देत न.प. शाळा.क्र.१ येथिल विद्यार्थींनी व शिक्षिका यांनी शाळा परिसरात असलेल्या वृक्षास राखी बांधून यंदा नारळी पौर्णिमा साजरी केली विशेष म्हणजे केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता तर,कोरोणा काळात प्रत्येकाला एक वृक्ष ऑक्सिजन देण्यात काय भुमिका देतो या विषयावर गांभीर्यपूर्वक लक्ष देत प्रत्येकाने वृक्षलागवड करून ते कसे वृध्दींगत होईल याची दक्षता घ्यावी हे प्रणही घेतले.सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळा मुख्याध्यापक आशिष साखरकर सर व सविता देठे, सरीता पडोळे,विपुल भोयर,सोनाली पांडे,भारत नगराळे आदी शाळेतील शिक्षक कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीने बनविलेल्या राख्या प्रदर्शनही ठेवण्यात आले होते.