हटके

अन लहानग्याने घेतला कुत्र्याला चावा , हे आहे कारण

Spread the love

बिजनौर / नवप्रहार मीडिया

                सोशल मिडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात काही खोडकर , काही मुलांचे बालिश पण दाखवणारे असतात.सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा कुत्र्याला चावा घेताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,साधारण २ ते ३ वर्षांचा एक लहान मुलगा कार शेजारी उभा आहे. उंची कमी असल्याने पायाच्या तळव्यावर उभा राहून तो त्याची बॅग खाली घेण्याचा प्रयत्न करत आहे. असे करताना तेथे एक काळ्या रंगाचा कुत्रा येतो. कुत्रा चिमुकल्या मुलाच्या पोटाला चावा घेतो. आपल्याला चावल्याचं समजताच दुसरं एखादं बाळ असतं तर रडलं असतं. मात्र या चिमुकल्याने जे काही केलंय त्याने सारेच थक्क झाले.

मला चावलास काय? थांब आता मी पण तुला चावणार असं म्हणत चिमुकला मुलगा थेट कुत्र्याची मान आपल्या छोट्याशा हाताने घट्ट पकडतो आणि कुत्र्याच्या डोक्याला कडकडून चावा घेतो. सदर घटना तेथे असलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. व्हिडिओ @chandpurofficial या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

 

 

 

सदर घटना बिजनौर येथील असल्याचं समजलं आहे. कारण व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये बदला घेताना बिजनौरचा मुलगा असं लिहिण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओपाहून यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी मुलाचं कौतुक केलंय तर काहींनी यावर टीका केली आहे. लहान मुलांना कुत्र्यांपासून दूर ठेवले पाहिजे, असं एकाने लिहिलं आहे.

मुलगा कुत्र्याला चावत असताना कुत्र्याने पुन्हा मुलाच्या तोंडाचा चावा घेतला असता तर? लहान मुलांची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी आपल्या मुलांचा जीव धोक्यात टाकू नका, अशा कमेंट देखील काहींनी केल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close