
पत्नीच्या अनैतिक संबंधाने संतापलेल्या पतीने तिला आणि प्रियकराला संपवले
निवाडी ( मध्यप्रदेश )/ नवप्रहार मीडिया नेटवर्क
बायकोने आजारी असल्याचा बहाणा करत शेजारी राहणाऱ्या कथित बाबा सोबत अनैतिक संबंध स्थापित केले. नवऱ्याला शंका आल्यावर त्याने तिच्यावर पाळत ठेवली.एक दिवस बाहेर जात असल्याचे सांगून तो लपून बसला. काही वेळाने शेजारी त्याला घरात जातांना दिसला.पाही वेळाने हा घरात गेला असता याला बायको आणि शेजारी नको त्या अवस्थेत दिसले. त्यामुळे राग अनावर झालेल्या या व्यक्तीने दोघाना कुऱ्हाडीचे घाव घालत संपवले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रामगोपाल कुशवाहा हा पत्नी अनिता सोबत निवाडी येथे राहत होता. त्याच्या शेजारी घनश्याम रायकवार नावाचा इसम राहत होता. घनश्याम हा कथित रित्या तंत्रमंत्र करून आजारी लोकांना बरे करीत असल्याचें सांगत होता. अनिता घनश्याम ला आपल्यावर काळी जादू करून घेण्यासाठी घरी बोलवत होती. अश्यातच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पतीरामगोपाल कुशवाहा याला पत्नी व शेजाऱ्यामध्ये असणाऱ्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागला होती. त्यांना रंगेहात पकडण्यासाठी त्याने सोमवारी कामानिमित्त घराबाहेर जाण्याचे नाटक केले व घराबाहेरच तो लपून राहिला. काही वेळाने त्याने शेजारी घनश्याम रायकवार याला घरात घुसताना पाहिले.
त्यानंतर काही वेळाने रामगोपाल घरात गेल्यानंतर पत्नी व शेजारी नको त्या अवस्थेत बेडवर पडलेले दिसून आले. यामुळे संतापलेल्या रामगोपाळने तेथे पडलेली कुऱ्हाड उचलून दोघांवर हल्ला केला. कुऱ्हाने वार दोघांची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, कुशवाहा यालाभारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या)आणि अन्य संबंधित कलमांन्वये अटक करण्यात आली आहे.




