क्राइम

गळा आणि पाय ओढणीने बांधलेल्या स्थितीत तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Spread the love

अकोला / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                     जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह ओढणीने गळा आणि पाय बांधलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. कृषी विद्यालया जवळील शेत शिवारात हा मृतदेह आढळला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास आरंभिला आहे.

किरण अर्जुन बळकर असे मृत तरुणीचे नाव आहे. किरण ही 27 तारखेपासून बेपत्ता होती. याप्रकरणी पातुर पोलीस ठाण्यात तिची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. किरण अर्जुन बळकर ही तरुणी 27 जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान शौचालय जाते म्हणून घरून निघून गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. परिसरात शोधाशोध घेण्यात आला आहे. मात्र कुटुंबियांना तिचा कुठलाही सुगावा लागला नव्हता. अखेर कुटुंबियांनी तिची बेपत्ता असलेली तक्रार पातुर पोलिसात दाखल केली. अखेर आज पातूर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळ असलेल्या एका शेत शिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात किरणचा मृतदेह दिसून आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. किरण बळकर या तरुणीचा हात आणि गळा ओढणीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला असून तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आधी गळा आवळला नंतर तिचे हात बांधून ठेवले असल्याचा अंदाज पोलिसांकडून घटनास्थळी वर्तवण्यात येत होता. तरीही किरणच्या मृत्युचे मूळ कारण अद्याप समोर आलं नाही आहे. वैद्यकीय अहवालानंतरच तिच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close