वृक्षारोपण करून कारगिल विजय दिवस साजरा
मुर्तिजापूर (प्रतिनिधी ) नेहरु युवा केंद्र , अकोला ( युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालय ) भारत सरकार द्वारा संचालित नेहरु युवा मंडळ , मुर्तिजापूर व तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय ” माझी वसुंधरा … माझे कर्तव्य … ” अभियानांतर्गत कारगिल विजय दिवसाच्या आठवणीत ठिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले .
बार्शीटाकळी येथील कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आयोजित विरत्व प्राप्त झालेल्या
सैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या आणि भारतमातेच्या सेवेचे व्रत स्विकारलेल्या आजी माजी सैनिकांचा संम्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले .
तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेयर सोसायटीचे मा.सुगत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि विष्णुदास मोंडोकर यांच्या सहयोगाने या अभियानाच्या वृक्षारोपण वेळी समन्वयक मिलिंद इंगळे , नेहरु युवा मंडळ , मुर्तिजापूर चे अध्यक्ष अनिल डाहेलकर , अमोल इंगळे , अभिजित देशमुख , मुकुंद काळे , बाळु बेलखेडे , आदेश महाजन , आकाश वानखडे , मंगेश वाडेकर , आदींसह वासुदेव ऊईके , श्रीकृष्ण अडसुळे , यांची उपस्थिती होती.