तरोडा येथे विषारी दारू प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू ,
५ मद्यपी अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती , मृतक व एका महिलेविरुद्ध मोर्शी पोलिसात गुन्हा दाखल
पो.स्टे. मोर्शी हद्दीत ग्राम तरोडा येथील घटना गावठी दारू पिण्यास दिल्याने मृत्यु सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद
मोर्शी(संजय गारपवार)दि.२० जुलै
दि. १९/०७/२०२३ चे २१.०० वा दरम्यान अमरावती ग्रामिण घटकातील पो.स्टे. मोर्शी हद्दीतील ग्राम तरोडा येथील काही पुरूष व महीला नामे १) जंगलु टेकाम, वय ६२, रा. तरोडा २) मयाराम धुर्वे, वय ६७ वर्षे, रा. तरोडा ३) सिताराम शेषराव परतेती,वय ३७ रा.तरोडा ४) सुंदा मयाराम धुर्वे, वय ६५ वर्षे, रा. तरोडा ५) सौ. सिंधु इसम धुर्वे, वय ४५, रा. तरोडा ६) सुखदेव जिवता उईके,रा.धानोरा यांनी दारू प्याल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली असुन त्यांना उप-जिल्हा रूग्णालय, मोर्शी येथे दाखल केले असल्याची माहीती प्राप्त झाली होती. माहीती प्राप्त होताच पो.स्टे. मोर्शी येथील प्रभारी अधिकारी यांनी रूग्णालय येथे जावुन अधिक माहीती प्राप्त केली की, सदर अस्वस्थ झालेल्या पुरूष व महीलांपैकी १) जंगलु टेकाम, वय ६२,रा. तरोडा २) मयाराम धुर्वे, वय ६७ वर्षे, रा. तरोडा यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असुन इतर अस्वस्थ रूग्णांपैकी १) सिताराम शेषराव परतेती, वय ३७ रा. तरोडा २) सुंदा मयाराम धुर्वे, वय ६५ वर्षे, रा. तरोडा ३) सौ. सिंधु इसम धुर्वे, वय ४५, रा. तरोडा पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रूग्णालय, अमरावती येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची दारू सौ. चन्द्रकला जंगलु टेकाम वय ४५, रा. तरोडा आली हीने पिण्यास दिली व १) सुंदा मयाराम धुर्वे, वय ६५ वर्षे, रा. तरोडा २) मयाराम धुर्वे, वय ६७ वर्षे, रा. तरोडा ३) सौ. सिंधु इसम धुर्वे, वय ४५, रा. तरोडा यांनी ती दारू पिली. दारू पिलेल्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उप-जिल्हा रूग्णालय, मोर्शी येथे उपचारा करिता दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान जंगलु टेकाम व मयाराम धुर्वे याचा मृत्यु झाला. तपासात मृतक मयाराम धुर्वे, रा. तरोडा यानेच ती दारू आणली होती व सदर दारू पिल्याने प्रकृती बिघडत असल्याचे माहीत असुन सुध्दा सौ. चंद्रकला टेकाम, रा. तरोडा हीने ती दारू वर नमुद इसमांना पीण्यास दिली वरून दान्ही आरोपी विरूध्द पो.स्टे. मोशी येथे अप.क्रं. ३१०/२३ कलम ३०४,३२८,३४ भा. दं.वी. अन्वये नोंद करण्यात आला आहे. चन्द्रकला टेकाम हीला गुन्हयाचे संबंधाने विचारपुस करण्यात येत असुन दुसरा आरोपी मयाराम धुर्वे हा उपचारा दरम्यान मरण पावला आहे.पो.स्टे. मोशी हे मध्यप्रदेश राज्याचे सिमेला लागुन असुन अनेकवेळा मध्यप्रदेश राज्याचे सिमावर्ती जिल्हयातील काही भागातून गावठी हातभट्टी दारू मध्यप्रदेश येथुन पो.स्टे. मोर्शी येथील सिमेलगतच्या काही खेडयात आणली जात असल्याचे दाखल गुन्हयांवरून निदर्शनास येत आहे. त्याच प्रमाणे सिमे लगतच्या खेडयातुन रोजगारा करिता मजुर वर्गाची ये-जा असते अश्यावेळी मध्यप्रदेश राज्याचे सिमे मधील एखादया खेडयातुन सदर गावठी दारू पिण्यासाठी आणली असावी असा प्राथमीक अंदाज आहे.
सदर घटनेचे अनुषंगाने ग्रामीण पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ ग्रा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, शशीकांत सातवअमरावती ग्रा. यांनी भेट दिलेली असुन गुन्हयाचा सखोल तपास उप-विभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण वेरूळकर ,पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल रणखांबे मोर्शी पोलीस करित आहे.