हटके

तिने बिबट्याला बकरी समजत ओढले त्याचे कान ; सत्य समजताच तिला दरदरून फुटला घाम 

Spread the love
.

संभाजी नगर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                 नागरी वस्तीत बिबट्याचा वावर ही आता सर्वसाधारण बाब झाली आहे. बिबट्या ने नागरी वस्तीत घुसून कुत्रा आणि अन्य प्राण्यांवर हमला केल्याच्या घटना वाचायला मिळतात.अशीच एक घटना गंगापूर तालुक्यात घडली आहे. येथे बकऱ्यांच्या शेडमध्ये बिबट्या घुसल्याने बकऱ्या बोबलायल्या लागल्या. त्यामुळे बाजूला राहत असलेल्या महिलेने बकऱ्यांचे भांडण सुरू आहे हे समजून बकऱ्यांच्या शेड मध्ये प्रवेश केला. आणि बिबट्याला बकरी समजून त्याच्या कान 0पकडला आणि त्याच्या डोक्यावर चापटा ही मारल्या. पण सत्य समजताच अक्षरशा तिने मृत्यूशी पंगा घेतला हे लक्षात येताच तिला दरदरून घाम सुटला.

              या आश्चर्यकारक घटनेबद्दल अधिक माहिती अशी की  गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मधुकर लांडे यांच्या शेतवस्तीवर रात्री साडेआठच्या सुमारास बकरी बांधण्याच्या शेडमध्ये बिबट्या शिरला. बिबट्याला पाहाताच बकऱ्यांनी आरडाओरड सुरू केली. बकऱ्यांचा आवाज बाजूलाच राहत असलेल्या महिलेला ऐकू गेला.

तिने शेडमध्ये जाऊन दोन्ही बकऱ्याचे भांडण चालू असल्याचे समजून बिबट्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याचा कान धरून त्याच्या डोक्यावरही चापटा मारल्या. महिलेचा आणि बिबट्याचा सर्व खेळ दोन ते तीन मिनिट सुरू होता. बिबट्या शिकारीमध्ये असल्यामुळे बिबट्याने महिलेकडे दुर्लक्ष केलं.

शिकार झाल्यानंतर महिलेला जेव्हा बिबट्या असल्याचे लक्षात आले त्यानंतर महिलेने आरडाओरड केली. महिलेचा आवाज ऐकून बिबट्याने तिथून धूम ठोकली. तोपर्यंत बिबट्याने एका बकरीची शिकार केली होती. या घटनेने महिलेचा चांगलाच थरकाप ऊडाला.

या संपूर्ण घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे महिलेचेदेखील कौतुक होत आहे. वन विभाग अधिकारी आणि पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

बिबट्यांच्या हल्ल्यात लक्षणीय वाढ –  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कळवळ येथे एका शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर मजुराच्या ओरडण्याचा आवाज आल्याने लोकांनी मदतीसाठी धाव घेत बिबट्याला काठ्यांच्या सहाय्याने पिटाळून लावले.

तरुणीच्या प्रसंगावधनाने तीचा आणि दोन जीवांचा जीव वाचला-   अहमदनगर जिल्ह्यात एक तरुणी आणि तिचे मोठे दोन भाऊ कुणाल भाऊसाहेब गागरे पाटील आणि तेजस भाऊसाहेब गागरे पाटील हे लोणीहून फोटो जर्नलिस्ट दत्तात्रय नामदेव विखे पाटील या त्यांच्या मामाच्या घरून वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून निघाले होते. कानडगावला घराच्या अगदी जवळ आल्यावर गिन्नी गवतातून बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यामुळे ते तिघेही मोटरसायकलवरून खाली पडले. मात्र, प्रसंगावधान दाखवून तरुणीने बिबट्यावर माती आणि दगडाने हल्ला केल्याने ते तिघेही वाचले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close