क्राइम

सरस्वती हत्याकांडात धक्कादायक खुलासे ; साने याला लैंगिक आजार आणि पॉर्न क्लिप पाहण्याचे होते व्यसन 

Spread the love

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

            मुंबई  शहरातील मीरा रोड वर काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्याकांडात धक्कादायक बाब समोर आली आहे. सरस्वतीचा लिव्ह इन पार्टनर मनोज साने याला पॉर्न व्हिडीओ पाहण्याची सवय होती. त्याने सरस्वतीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करण्याआधी त्याने तिच्या विवस्त्र मुतदेहासोबत स्वतः विवस्त्र होऊन फोटो काढल्याची पोलीस तपासात उघड झाली आहे. मनोज याला लैंगिक आजार होता.आणि त्याचे इतर महिलांशी चालणारे चॅटिंग आणि पॉर्न व्हिडीओ पाहणे यापैकी कुठल्या तरी कारणाने ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मनोज साने (५६) हा ‘Sex Addict’असून सरस्वतीचे तुकडे करण्याआधी तिच्या विवस्त्र मृतदेहासोबत त्याने स्वतः नग्न होऊन छायाचित्रे काढली. नंतर त्याने पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचे पाेलिस तपासात उघड झाले आहे. साने याने सरस्वतीपासून लैंगिक आजाराची माहिती लपवली हाेती. त्याचे अन्य महिलांशी चालणारे चॅटिंग, पॉर्न व्हिडीओ बघणे आदीपैकी कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.

तत्पूर्वी, ताकातून कीटकनाशक देऊन तिची हत्या केली होती. मनोज सानेने आपली लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या करण्याचा कट रचला होता. यासाठी त्याने बोरीवलीतील एका दुकानातून कीटकनाशक खरेदी केले. हे कीटकनाशक ताकात मिसळून त्याने सरस्वतीला दिले. हे ताक पिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अटक झाल्यानंतर मनोजने तिने आत्महत्या केल्याचा दावा करत पोलिसांची दिशाभूल केली. तसेच आपण या प्रकरणी पकडले जाऊ नये म्हणून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असेही त्याने सांगितले. पण आता मनोजनेच सरस्वतीला ताकातून कीटकनाशक देऊन ठार केल्याचे व त्यानंतर तिचे तुकडे केल्याचे स्पष्ट झाले आहे. घटना तिसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर आरोपीच्या क्रौर्याचा कळस काय होता, हे पोलिसांना समजले.

दुकानदाराने ओळख पटवली
आरोपीने बोरीवलीतील एका दुकानातून कीटकनाशक खरेदी केले. या दुकानदाराने आरोपीला ओळखले आहे. कारण, कीटकनाशकाची विक्री केल्यानंतर त्याचे नाव, बॅच नंबर आदी गोष्टींची नोंद रजिस्टरमध्ये करावी लागते. सानेच्या घरी आढळलेले कीटकनाशकावरील तपशील या नोंदीसारखाच आहे. त्याचा डबाही आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close