हटके

वाचा … आईवडिलांनी मुलाच्या मृतदेहाजवळ का कापला केक

Spread the love

                  एका दुर्दैवी आई वडिलांवर मृतदेहाजवळच केक कापण्याचा प्रसंग ओढावला आहे. ज्यांनी ही हा प्रसंग पहिला त्यांना अश्रू अनावर झाले. पण म्हणतात न की दैवापुढे कोणाचे काहीच चालत नाही तसलाच प्रकार या प्रकरणात घडला आहे. 

            घटना हैदराबाद येथील आहे. येथे एका 16 वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. कुटुंबीयांनी त्याच्या वाढदिवसाची तयारी सुरू केली होती. नातेवाईक आणि मित्रमंडळी जमले होते. केक देखील आला होता. पण इतक्यात त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याने जीव सोडला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.”

सचिन असे मृत मुलाचे नाव आहे. तो सोळा वर्षांचा होता. तो आपल्या कुटुंबासह असिफाबाद विभागातील बाबापूर गावात राहत होता. सचिन त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप आनंदी होता. त्याच्या कुटूंबियांनी खास पार्टीचे आजोन केले होते. बर्थ डे पार्टी सुरु असताना सचिनच्या छातीत दुखू लागले. सचिन याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आनंदाचा माहौल दुख:त पसरला

हृदयविकाराच्या झटक्याने सचिन याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेहाजवळ केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. शोकाकुल झालेल्या पालकांनी श्रद्धांजली म्हणून केक सचिनच्या मृतदेहाजवळ ठेवला. हे दृष्य पाहून सचिनच्या अत्यंसस्कारासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील भरुन आले. सचिन हा इयत्ता दहावीत शिकत होता. तो अभ्यासात देखील खूप हुशार होता. त्याचा स्वभाव देखील खूपच मन मिळावू होता असे त्याचे मित्र सांगतात.

वाढदिवस साजरा होत असतानाच चिमुरडीचा मृत्यू

जळगावच्या मुक्ताईनगर शहरात कुलरचा शॉक बसून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. वैष्णवी सनांसे असं या तिचं नाव आहे. दुर्दैव म्हणजे घरात वैष्णवीचा वाढदिवस साजरा होत असतानाच, तिला कुलरचा जोरदार शॉक लागला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.

 तरुणीचा  देखील वाढदिवसीच मृत्यू

चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेला तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेल्याची घटना मालेगावात घडली होती. एका निनावी फोननंतर पोलिसांनी दखल घेत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नेहाचा वाढदिवसादिवशीच मृत्यू झाला होता.तिच्या पार्थिवावर श्रीरामनगरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र निनावी फोनवर एका अज्ञात व्यक्तीने नेहाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा सांगितले. आणि पोलिसांनी दखल घेत थेट स्मशानभूमी गाठली. अंत्यसंस्कारसाठी चितेवर ठेवलेला नेहाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी दुपारी नेहाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं गूढ उलगडणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close