हटके

चोरी करण्यासाठी आलेला चोर टल्ली होऊन घरातच झोपला

Spread the love

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                 समाजात काही घटना अश्या घडत असतात की त्यावर हसावं की रडावं हेच समजत नाही. आम्ही आता आपणाला अश्याच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. काही वेळा चोर चोरी करायला घरात घुसले आणि तेथे जेवन करून गेले असे ऐकले असाल. पण चोर चोरी करायला आला आणि दारू पिऊन बेडरूम मध्ये टल्ली होऊन पडून राहिला. घरची मंडळी आल्यावर त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. महत्वाचे असे की ती घरची मंडळी देखील चोराच्या उठण्याची वाट पाहत होती.तो जागा झाल्यावर त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले.

” लग्न आटोपून परत आल्यानंतर  कुलूप उघडले  असता शरवानंद यांना  घराच्या गेटचा वरचा भाग तुटलेला दिसला. घरातील सर्व वस्तू विखुरलेल्या होत्या. मी बेडरूममध्ये पोहोचताच त्यांना एक तरुण आरामात झोपलेला आणि त्याच्या बाजूला दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसल्या,” असे घराचे मालक शरवानंद म्हणाले.

त्यांच्या घरातून 10 तोळे सोनं, सुमारे दीड लाख रुपयांचे चांदीचे दागिने, 50 हजार रुपये किमतीच्या 40 साड्या आणि 6 लाख रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

यानंतर शरवानंद यांच्या कुटुंबीयांनी तो चोराचा साथीदार उठण्याची वाट पाहिली आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. सलीम असे त्याचे नाव आहे. तपासादरम्यान त्याने पोलिसांना सांगितले की तो आणि त्याचा साथीदार असे दोघे मिळून चोरी करतात. यावेळी त्यांनी शरवानंद यांच्या घराला लक्ष्य करत तेथे चोरी केली होती.

दोघांनी घरात घुसून मौल्यवान वस्तू शोधल्या, असे सलीमने पोलिसांना सांगितले. त्यानंतर सलीमच्या म्हणण्यानुसार त्याच्या साथीदाराने त्याला घरात साठवलेली दारू पाजली. दारूच्या नशेत सलीम बेडरूममध्ये निघून गेला तर त्याचा साथीदार लुटीचा माल घेऊन पळून गेला. पोलीस आता या साथीदाराचा शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close