हटके

मुलाने श्वास घेतला की वाजते शिट्टी

Spread the love
नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: ईदच्या दिवशी शिट्टीवाली चप्पल मिळाल्यानं चार वर्षांच्या साहिलचा आनंद गगनात मावत नव्हता. साहिल चालू लागला की शिट्टी वाजायची. मात्र हा आनंद रात्रीपर्यंतही टिकला नाही. खेळता खेळता साहिलनं शिट्टी गिळली. ती श्वसन नलिकेत अडकली. साहिलनं श्वास घेतल्यावर शिट्टी वाजायची. त्याला तातडीनं एम्समध्ये नेण्यात आलं. एम्सच्या डॉक्टरांनी गळ्यातून शिट्टी काढून साहिलचा जीव वाचवला. ही घटना हरयाणाच्या नूहमध्ये घडली आहे.

 
             ईद च्या दिवशी एक आई घाबरलेल्या अवस्थेत आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन एम्स मध्ये दाखल होते. रुग्णालयात दाखल होताच तिची नजर डॉक्टर ला शोधत असते. डॉक्टर तिसताच ती त्यांच्याकडे पळत सुटते असे म्हणण्यापेक्षा ती त्यांच्याकडे झेपावते. आणि थरथरत्या आवाजात डॉक्टरांना सांगते की तिचा मुलगा श्वास घेतो तेव्हा शिटी वाजते. पहिल्यांदा तो खोकला त्यावेळी शिटीचा आवाज आला आणि त्यानंतर ती सतर्क झाली. तिने लक्ष दिले असता तो जेव्हा जेव्हा श्वास घेत होता तेव्हा तेव्हा शिटीचा आवाज येत होता. 
 
             डॉक्टरांनी तिला धीर देत म्हटके की घाबरण्याचे कारण नाही आम्ही लवकरच साहिल ला पूर्ववत करू. वास्तविक  शनिवारी ईदच्या निमित्तानं साहिलला नवी चप्पल मिळाली. रात्री आठच्या सुमारास साहिल खोकला. त्यावेळी आईला शिट्टीचा आवाज ऐकू आला. त्यानं जोरजोरात श्वास घेतल्यावरही शिट्टीचा आवाज ऐकू येऊ लागला. आई साहिलला घेऊन जवळच असलेल्या दवाखान्यात घेऊन गेली. तिथल्या डॉक्टरांनी साहिलला एम्समध्ये नेण्यास सांगितलं. शनिवारी मध्यरात्री साडे तीन वाजता आईनं साहिलला घेऊन एम्स गाठलं. तिथल्या वरिष्ठ डॉक्टरांनी घटनेची माहिती देण्यात आली.

पुढील दीड तासांत शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. रविवारी पहाटे साडे पाच वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात झाली.40 मिनिटं शस्त्रक्रिया चालली. एम्सचे संचालक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. एन. श्रीनिवास, डॉ. प्रबुद्ध गोयल यांच्या टीमनं शिट्टी काढून मुलाचा जीव वाचवला. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं साहिलच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला.

फुफ्फुसाच्या दिशेनं जाणाऱ्या श्वसन नलिकेत शिट्टी अडकली होती, अशी माहिती डॉ. प्रबुद्ध गोयल यांनी दिली. शिट्टीला असलेलं छिद्र सुदैवानं जाम झालं नाही. त्यामुळे साहिल श्वास घेऊ शकत होता. डॉक्टरांनी एंडोस्कोपी करुन शिट्टी बाहेर काढली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टरांनी साहिलला जीवदान दिलं.

अशा प्रकारची समस्या आता सामान्य झाली आहे. दरवर्षी अशी समस्या घेऊन सरासरी 100 जण येतात, असं बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिनू वाजपेयी यांनी सांगितलं. शेंगदाणे, बदामाचे तुकडे, बटण, बॅटरी, मोती, चपलांमधील शिट्टी श्वसन नलिकेत अडकल्याची तक्रार घेऊन अनेक जण असतात. आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया घेऊन त्यांना दिलासा देण्याचं काम करतो, असं वाजपेयी म्हणाल्या.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close