हटके

मोराने केला महिलेवर हमला ; कारण जाणून आपणही कराल मोराचे कौतुक

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                  भूतलावरील प्रत्येक व्यक्ती आणि प्राणी हा आत्मरक्षणाचा प्रयत्न करीत असतो. प्राण्यांवर हमला झाला की ते स्वरक्षणार्थ समोरच्या व्यक्तीवर हमला करतात. हा प्रकार हिंस्रक पशुच करतात असे नाही तर पाळीव प्राणी देखील अश्या वेळेस समोरच्या व्यक्तीवर हमला करतात.सध्या सोशल मीडियावर मोराने महिलांवर हमला केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

निरनिराळ्या प्राण्यांचे निराळे व्हिडीओ पहायला मिळतात. अशातच अनेकवेळा आश्चर्यचकित करणाऱ्या घटना समोर येतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे जी पाहून तुम्ही थक्क व्हाल. एक मुलगी मोराची अंडी चोरण्याचा प्रयत्न करत होती.

मात्र मोराने तिला आणि तिच्या साथीदाराला चांगलीच अद्दल घडवली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती झाडावर चढून अंडी चोरत आहे. एक महिला झाडाच्या खाली उभी राहून ती अंडी आपल्या कपड्यात गोळा करतेय.

तेवढ्यात तिथे मोर येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. पहिल्यांदा झाडावरुन अंडी घेणाऱ्यावर तो हल्ला करतो नंतर खाली उभ्या असेल्या महिलेच्या अंगावर उडी घेतो. मोराच्या हल्ल्यात महिला खाली कोसळते.
दरम्यान, जंगलात कोणी पक्ष्यांची अंडी चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यांची अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. हा त्यांचा विशेष गुण आहे ज्याला इंग्रजीमध्ये “पॅरेंटल इन्स्टिंक्ट” म्हणतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close