हटके

7 व्या वर्षी अपहरण झालेला व्यक्ती 30 वर्षानंतर परतला घरी 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क

                 जगात काही घटना अश्या घडतात की ऐकून वाटते हे एखाद्या चिंत्रपटाचे कथानक तर नव्हे. चित्रपटाच्या कथानकाला साजेशे प्रकरण राजधानी दिल्ली नजीकच्या गाझियाबाद येथे घडले आहे. येथील 30 वर्षांपूर्वी अपहरण झालेला बालक घरी सुखरूप परतला आहे. तो 7 वर्षाचा असताना आणि शाळेतून बहिणी सोबत परत येत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते.

 साहिबाबाद येथील रहिवासी असलेला हा व्यक्ती 8 सप्टेंबर 1993 या दिवशी गायब झाला होता. यासंबंधी कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती, मात्र त्याचा कसलाच सुगावा लागू शकला नाही. अखेर वयाच्या 30 व्या वर्षी हा व्यक्ती स्वत:च्या घरी परतला आहे.

घरी परतल्यानंतर या व्यक्तीने सांगितले की, तो आणि त्याची बहीण शाळेतून परतत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी राजूला राजस्थानला पाठवून दिले. तो इतकी वर्ष त्याच ठिकाणी होता. राजस्थानात पोहोचल्यानंतर त्याला दररोज मारहाण करून कामाला लावले जाई. त्या बदल्यात त्याला फक्त संध्याकाळी एक भाकर दिली जात असे. इतकेच नाही तर रात्री तो पळून जाऊ नये म्हणून त्याला बांधून ठेवण्यात येत असे.

अखेर एका दिवशी त्याने स्वत:ची सुटका करून घेतली आणि दिल्लीला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये चढला. त्याला दिल्ली शहर आठवत होते मात्र तो कोणत्या भागात राहायचा आणि त्याच्या आई-वडीलांची नावे काय होती हे मात्र तो विसरून गेला होता. राजधानी दिल्लीत पोहचल्यानंतर त्याने असंख्य पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारल्या, पण त्याला कुठलीही मदत मिळाली नाही.

मात्र पाचएक दिवसांपूर्वी तो गाझियाबाद येथील खोडा पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. त्याने सांगितलं की, येथील पोलिसांनी त्याची चांगली काळजी घेतली. तसेच त्याला शूज दिले, जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली. यानंतर पोलीसांनी राजूबद्दलची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली. यानंतर काही वेळातच राजूच्या काकांनी पोलीसांशी संपर्क साधला आणि त्याचे कुटुंबिय त्याला घ्यायला आले. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी रजनीश उपाध्याय यांनी सांगितले.

दरम्यान तब्बल 30 वर्षांनी घरी परतलेल्या राजूने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “मला आता खूप बरे वाटत आहे”. तो पुढे बोलताना म्हणाला की, “मी भगवान हनुमानाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडवून आणावी यासाठी मी त्यांच्याकडे सातत्याने प्रार्थना करत होतो”. पुढे बोलताना 37 वर्षीय राजूने सांगितले की, ज्या व्यक्तीच्या घरी त्याला बंदी बनवून ठेवले होते, त्याच्या धाकट्या मुलीने त्याला भगवान हनुमानाची पूजा करण्यास सांगितले. तसेच त्याला पळून जाण्यास आणि आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close