आरोग्य व सौंदर्यसामाजिक

महादेव कोळी जमातीच्या विवीध मागण्यासंदर्भात सरसावले नितीन कदम

Spread the love

विभागीय आयुक्त कार्यालयात शेकडो कोळी बांधवासोबत धडक मोहीम

महादेव कोळी जमात अन्नत्याग आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस

 

प्रतिनीधी / अमरावती

*स्थानिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ (वऱ्हाड) अकोला व बेरार आदिवासी कोळी महादेव सेवा संस्था कावसा द्वारा अन्नत्याग आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असताना नितीन कदम यांनी महादेव कोळी जमातीच्या विवीध मागण्यासंदर्भात आपले जाहीर समर्थन प्रकट केलें.६ डिसेंबर रोजी सुरु झालेल्या या आमरण उपोषणाला राजेन्द्र उर्फ बाबा भुयार व गजानन चूनकिकर यांनी सुरुवात करत आज उपोषणाचा तिसरा दिवस असताना प्रशासन व शासनाचे आंदोलनाची दखल घेतली नाही. परंतु आपल्या कार्यतत्पर्तेचा परिचय देत नितीन कदम यांनी उपोषणस्थळी भेट देत आपला व संकल्प बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला. दरम्यान नितीन कदम यांच्या नेतृत्त्वात धडक मोहीम राबवून विभागीय आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले.*
*या निवेदन वेळी महादेव कोळी जमातीच्या विवीध मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे उपोषण कर्त्यांनी व आंदोलकांनी केले.*

*महादेव कोळी जमातीच्या प्रमुख ४ मागण्या*

*१) जाती आणि जमाती सुधारणा कायदा (१०८) १९७६ चा कायदा करण्यासाठी वापरलेले १९५० पूर्वीचे पुरावे विचारत घेउन अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र येथील संबधीत उपविभागीय अधिकारी मार्फत त्वरित देण्यात यावे.*

*२) जाती आणि जमाती (सुधारणा कायदा) १०८/१९७६ चा कायदा करण्यासाठी वापरलेले १९५० पूर्वीचे पुरावे विचारत घेवून अन जमाती पडताळणी समिती अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीला वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.*

*३) जात प्रमाणपत्र देण्याचे विनियम २००३ अन्वये नियम (३ ख) करिता जाती आणि जमाती आर्वी रसेल लिखित मानव वंश शास्त्रज्ञ यांचे पान न. ५३२ ते ५३५ पर्यंत केलेला विस्तृत वर्णनात्मक पुरावा विचारात घ्यावा*

*४) विनिमय २००३ अन्वये ४(१) करिता मागितलेल्या वास्तव्याचा पुराव्या करिता १९५० पूर्वीची कोळी नोंद असलेल्या कोतवाल बुक नक्कल वास्तव्याचा पुरावा म्हणून वापरावा.*

*अशा विवीध मांगण्याकरिता नितीन कदम यांच्या नेतृत्वात महादेव कोळी जमातीच्या वतीने धडक मोहीम राबवून विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.*
*यावेळी राजेन्द्र जुवार, गुजनान चूनकीकर, वसंत चूनकीकर, भास्कर कोलटेके, गणेश पाटील, रघुनाथ वानखडे,पांडुरंग बुध, मोहन भातकुलकर, उमेश मानकर, पांडुरंग बगाडे, बाबुलाल वानखडे, संजय चूनकीकर, संदीप कोलटेके, कृष्णा वानखडे, आकाश मानकर, रघुनाथ वानखडे, सोपान कुटेमाटे, गजानन सखे, निलेश गाडे, प्रमोद जूवार, विवेक जवांजळ, नाजूक भोपशे, गणेश जांभूळकर, रवींद्र ढोरे, बाळकृष्ण नाटे, उमेश मानकर, सोपान भटकर, निरंजन शेंद्रे, सुधाकर घुगरे, तुलसीदास आडे, अशोक, कोलटेके, आकाश जुवार, रवि जामनेकर, पांडुरंग बगाडे, संजय झासकर, गजानन सखे, स्वप्निल कुटेमारे, देवानंद नाटे, अर्पित गवजे, गणेश इंगळे,अभिषेक डोंगरे, आशिष इंगळे, शुभम पारखे, रजत गाडे, रवी नाटे, हरी राउत आदि उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close