हटके

लोकांचा एलियन पहिल्याचा दावा ; त्याच्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा असा होत नव्हता

Spread the love

              एलियन ( पर ग्रहावर राहणारे मनुष्य प्राणी) बाबत आजही जनतेच्या मनात या एक प्रश्न आहेत. अनेक लोक एलियन असल्याचे मान्य करतात तर अनेक ती अंधश्रद्धा असल्याचे सांगतात. सध्या पेरू येथील नागरिकांनी 7 फुटाचा एलियन पाहिल्याचे सांगितले आहे. तर  एलियनने त्यांच्यावर हल्ला केल्याचे त्यांचे मत आहे. याचबरोबर स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे की, बंदुकीच्या गोळ्यांचा संबंधित एलियन वर वर्षाव केला असता त्यावर काहीही परिणाम होत नव्हता. कारण त्याला एक चिलखत होते.

यामुळे घडलेल्या या घटनेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काही लोकांनी याची तुलना अंधश्रद्धेशी केली आहे.या बाबत पोलिस अधिकार्‍यांच्या मते बेकायदेशीर सोन्याचे उत्खनन या गुन्ह्याशिवाय यात दुसरा कोणताही पैलू नाहीये. आम्हाला यात एलियन्सचा संशय नाहीये. ब्राझीलच्या ‘ओ प्राइमरो कोमांडो द कॅपिटल’ आणि कोलंबियाच्या ‘क्लॅन डेल गॉल्फो’, सारख्या ड्रग कार्टेलशी हे प्रकरण जोडले गेले असावेत असा दावा त्यांनी केला आहे. सोन्याचे संबंधित “माफिया” या हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत.


सरकारी वकिलांनी सांगितले की, सोने माफिया दहशत पसरवून पेरूमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पेरूमधील नानय नदीच्या आसपासच्या जंगलात सोने शोधण्यासाठी जेटपॅकचा वापर केला आहे.

याबाबत इकिटूचे नेते जैरो रेतेगुई यांनी सांगितले की, हल्लेखोर मानव नसून तो एक एलियन आहे. त्यावर दोनदा गोळी झाडण्यात आली. पण तो पडला नाही. तर तो तिथून गायब झाला. गावात जे चालले आहे. यामुळे सर्वांनाच भीती वाटत आहे.

त्याचबरोबर अजून एका साक्षीदाराने असे सांगितले की, एका शिक्षकांनी जमिनीवरून विचित्र प्राणी उडताना पाहिले. या प्रकरणाचा तपास करणारे सरकारी वकील सांगत आहेत की, हल्लेखोर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम करत आहे. अमर उजाला या वृत्त संस्थने हे वृत्त प्रकाशित केले आहे

.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close