Uncategorized
प्रशांत महासागराच्या आत संशोधकांच्या हाती लागल्या आश्चर्यकारक गोष्टी


नवी दिल्ली / नवप्रहार ब्युरो
हरित ऊर्जा संक्रमणासाठी आवश्यक धातूंची जगभरात मागणी आहे. अनेक देश हे धातू समुद्राच्या तळापासून मिळवत असतात. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संशोधनात ४००० मीटर खोलीवर समुद्रात मोठ्या संख्येने नवीन सागरी प्रजातींचा शोध लागला आहे.
संशोधकांच्या टीमने तब्बल १६० दिवस काम केले आणि पाच वर्षे संशोधन केले. समुद्रातील खणकामामुळे पर्यावरणावर काय परिणाम होते, याचा अभ्यास ही टीम करीत होती. मात्र खणकामाचा कुठलाही नकारात्मक परिणाम त्यांना दिसला नाही. मात्र काही जैवविविधतेमध्ये थोडीशी घट नोंदवण्यात आली.
संशोधकांनी प्रशांत महासागराच्या खोल समुद्रतळावरील जीवनाचा बारकाईने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. ‘नेचर इकोलॉजी अँड एव्होल्यूशन’ या शोधपत्रिकेत हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. संशोधक थॉमस डहलग्रेन यांनी सांगितलं की, या क्षेत्रात असलेले व्यावसायिक आणि भू-राजकीय हितसंबंध नसते तर हा अभ्यास शक्य झाला नसता, कारण हे महत्त्वपूर्ण धातू खोल समुद्रतळावर मोठ्या प्रमाणात आढळतात.
संशोधकांनी या पाच वर्षांच्या कालावधीत सागरी जीवनाचा शोध घेतला. धातू काढणाऱ्या मशीनच्या प्रभावाचे परीक्षणही त्यांनी केले. मशीनच्या मार्गांमध्ये प्राण्यांच्या संख्येत ३७% घट झाली आहे, तर प्रजातींच्या विविधतेमध्ये ३२% घट नोंदवली गेली आहे. परीक्षण केलेला खोल समुद्रतळ पाण्याच्या पृष्ठभागापासून ४,००० मीटर खाली आहे.
संशोधकांनी जेव्हा खोल समुद्रात जैवविविधतेचा अभ्यास केला तेव्हा त्यांना काही नवीन प्रजाती आढळून आल्या. वैज्ञानिकांनी आधी ४,३५० हून अधिक प्राणी गोळा केले. त्यापैकी एकूण ७८८ प्रजातींची ओळख पटली. यात समुद्री ब्रिसल कृमी, क्रस्टेशियन्स आणि गोगलगाय व शिंपल्यांसारखे मोलस्क यांचा समावेश होता. यापैकी बहुतेक प्रजाती यापूर्वी कधीही आढळून आलेल्या नव्हत्या.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



