क्राइम

मित्राच्या 20 वर्षीय मुलीवर आला जीव नाही म्हणताच केले असे….

Spread the love

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी

एका व्यक्तीचा मित्राच्या 20 वर्षीय मुलीवर जीव आला त्याने तिच्या समोर विवाहाची गळ घातली.तिने नकार देताच त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतले.या प्रकरणात व्यक्तीचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणीसोबत नाते जुळले नसल्याने मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे.

47 वर्षीय व्यक्तीचे मित्राच्याच मुलीवर जडला जीव

मृत तरुणाची ओळख संदीप अशी समोर आली, तो उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर येथील रहिवासी होता. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप आपल्या मित्राच्या घरी जायचा. यादरम्यान त्याचा मित्राच्याच मुलीवर जीव जडला होता. तरुणी दिल्लीच्या वजीपुर इंडस्ट्रीयल एरियामध्ये भांड्याच्या एका फॅक्टरीत काम करत होती. ती दिल्लीत एकटीच राहत होती.

पोलिसांच्या अनुसार, संदीप हा तरुणीला सतत फोन करू लागला होता. काही काळापासून तिने त्याच्याशी बोलणंच बंद करून टाकलं होतं. ज्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. तो गुरुवारी दिल्लीत आला होता, दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी तो पेट्रोलच्या दोन बाटल्या घेऊन तरुणीच्या फॅक्टरीत पोहोचला होता.

विवाहास तरुणीचा नकार

पोलिसांच्या माहितीनुसार, संदीपने तरुणीशी विवाह करण्याचा हट्टा धरला होता. तिने नकार दिल्यानंतर त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवलं. फॅक्टरीत कामगार तात्काळ त्याच्या मदतीला धावले, नंतर आग विजवण्याचा प्रयत्न केला. संदीपला दीपचंद बंधू रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला.

संदीपने एक चिठ्ठी मागे ठेवली होती, ज्यात त्याने दावा केला की, महिलेनं त्याच्याशी मैत्री तोडली होती. तिच्या मृत्यूसाठी त्याने हेच कारण जबाबदार धरले. मात्र महिलेनं पोलिसांना सांगितलं की, संदीपसोबत तिचे कोणतेही नाते नव्हते. सध्या, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची माहिती संदीपच्या कुटुंबीयांना देण्यात आली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close