राजकिय

जमिनीच्या वादातून तरुणाचे शीर केले धडावेगळे 

Spread the love

आईने मुलाचे शीर कुशीत घेऊन फोडला हंबरडा

जौनपूर (युपी) / नवप्रहार डेस्क 

                   जमिनी वरून आपसात किंवा शेजाऱ्यांशी वाद हा काही नवीन विषय नाही. पण काही वेळा हा वाद विकोपाला गेला की मग वादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत होते. असाच प्रकार उत्तरप्रदेश च्या जौनपूर येथे घडला आहे. याठिकाणी जमिनी वरून उदभवलेल्या वादात विरोधी पक्षाने 1उ वर्षीय तरुणांवर तलवारीने हल्ला करत त्याचे शीर धडावेगळे केले आहे. आईने मुलाचे शीर कुशीत घेऊन हंबरडा फोडला त्यावेळी समाज मन सुन्न झाले.

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना बुधवारी (30 ऑक्टोबर) घडली. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौराबादशाहपुर मधील कबीरुद्दीन या गावात दोन गटांमध्ये जमीनीवरून वाद सुरू होता. बुधवारी या वादाचे रुपांतर भयंकर अशा हाणामारीत झाले. यावेळी झालेल्या झटापटीत रामजीत यादव यांचा 17 वर्षीय मुलगा अनुराग याचा विरोधी गटातील लोकांनी पाठलाग केला. यातील एकाने अनुरागवर तलवारीने जबर वार केला आणि काही क्षणात अनुरागचे शीर धडापासून वेगळे झाले. सदर घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे धडावेगळे झालेले शीर कुशीत घेऊन आई तासंतास मोठमोठ्याने रडत होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close