शैक्षणिक

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत सांस्कृतिक महोत्सव साजरा

Spread the love

पवनार वार्ताहर 

बाजीराव हिवरे. जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा पवनार येथे २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७.३० शाळेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य मान्यवर, पवनार ग्रामवासी,सन्मानिय पालकवर्ग, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी,शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी व सर्व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका,मदतनीस, इत्यादीच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया हेडाऊ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात जि.प.प्रा.कन्या पवनार येथे साजरा करण्यात आला. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२४ ला दुपारी १२ ते ५ वाजे पर्यंत प्राथमिक कन्या शाळा पवनार येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री पुरूषोत्तम हिवरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले, उपाध्यक्षा सौ.सोनाली वैद्य, सदस्य खुशाल सरोदे, गणेश नौकरकर,अशोक सरोदे, रुपेश वानखेडे, सोनू उमाटे,दिपाली राऊत,मंगला वैद्य,सुजाता रघाटाटे, सारिका मरस्कोल्हे,ललिता मेश्राम, रोशनी अवचट,इत्यादी व्यवस्थापन समिती सदस्यांनी सुद्धा सावित्री बाई फुले यांच्या फोटो पुष्प हार घालून पूजन करण्यात आले. उपस्थित प्रमुख मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन आणि विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया हेडाऊ यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहाय्यक शिक्षिका सौ.ताई केंद्रे यांनी केले, कार्येक्रमची रूपरेषा,माडणी आणि सादरीकरण साहाय्यक शिक्षिका सौ.मनीषा तडस यांनी केले. वर्ग पहिली ते ५ वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होऊन प्रत्येकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठावर बाल कलाकारांनी एकापेक्षा एक सरस आप आपली कला दमदार पणे सादर केली, कार्यक्रमात सहभागी बाल कलाकारांनी, शेतकरी आत्महत्या नाट्यछटा, व्यसनमुक्ती नाट्यछटा, एकपात्री नाटक, एकल नृत्यू, समूह गायन, समूह नृत्य, देश भक्तीपर समूह नृत्य, गरभा नृत्य,दांडिया समूह नृत्य, शाळा स्वच्छ्ता अभियानावरील नाट्यछटा, ग्राम स्वछता अभियान पथनाट्य,अशाप्रकारे ३५ एक

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close