दर्यापुर तालुक्यात अजित 155 बियाण्याचा तुटवडा शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा
दर्यापुर — कैलास कुलट— दर्यापुर तालुक्यातील येवदा गावालगत परिसरात अजित 155 बियाणे चा कृषी केंद्रात तुटवडा असल्याचे दिसून आले शासनाकडून शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच होत असल्याचे बोलल्या जात आहे कारण आज गांधी चौक येथे असलेले आशिष कृषी सेवा केंद्र ह्या ठिकाणी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अजित 155 बियाणे चा वाटप करण्यात आला परंतु प्रत्येक एक शेतकऱ्याला अजित 155 या बियाण्याची बॅग प्रत्येकी दोन देण्यात आले यामध्ये अल्पभूधारक शेतकरी असो की 100 एकर वाला शेतकरी असो प्रत्येक एक शेतकऱ्याला दोन बॅग वाटप करण्यात आला सकाळपासून उन्हात बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या यामध्ये वयोवृद्ध शेतकरी सुद्धा होते अजून पर्यंत पावसाची हजेरी नसल्यामुळे उन्हाचं तापमान 46 अंश असून रांगेत उभा असलेला वयोवृद्ध शेतकऱ्यांना जीवाचं काही झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांकडून निर्माण झाला होता यावरून दिसून येत आहे की शासन व कृषी विभागामार्फत एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा होत असलेली दिसून येते बियाण्याच्या दोन बॅगा घेऊन शेतकरी किती एक शेती पेरेल हा सुद्धा शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण पडला आहे कृषी विभागाने शासनाकडे 155 बियाण्याची मागणी करून शेतकऱ्यांना पूर्ण बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून कृषी केंद्र चालकांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावे व कृषी विभागाकडे बियाण्याची मागणी करावी असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे कृषी केंद्र संचालकालांनी सुद्धा सर्व गावातील शेतकऱ्यांना समसमान ठेवून बियाणी वाटप करावा प्रत्येक वर्षी कृषी केंद्र संचालक अजित 155 बियाणे चा तुटवडा सांगून चढ्या भावाने विक्री करतात व आपले खिशे गरम करतात असे ह्या वेळेस झाल्यास परिसरातील शेतकरी आक्रमण भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असे यावेळेस सांगण्यात आले