विदेश

यमराज सुटीवर असले की असं होतं 

Spread the love

१३ व्या मजल्यावरून  पडून ही तरुणी जिवंत 

               मृत्यू हा अटळ आहे. मनुष्य जीवनात आला की त्याचा मृत्यू हे जिवनचक्राचा भाग आहे. पण कधी कधी असा चमत्कार होतो की मृत्यूच्या दाढेत जाऊन देखील मनुष्य सकुशल परत येतो. अश्या वेळी यमराज सुटीवर होते असेE मिश्किल पणे म्हटल्या जाते. तर याला सामान्य लोक ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती ‘ असे म्हणतात. असाच प्रकार रशियात घडला आहे. येथे इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून पडून देखील मुलगी बचावली आहे.

  एवढ्या उंचावरून ही तरुणी पडल्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच श्वास रोखले गेले होते. पण, एवढ्यावरून ती तरुणी खाली पडूनही जिवंत असल्याचं पाहिल्यावर कोणीही सुटकेचा नि:श्वास सोडेल. पण, यावर साहजिकपणे तुमचा विश्वास बसणार नसला तरी हे प्रत्यक्षात घडलंय हे लक्षात घ्या. मग तिथे असा कोणता चमत्कार घडला, हे जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता खात्रीने वाढली असेल. तेव्हा ती नेमकी दुर्घटना समजून घेऊ.

मृत्यूच्या दारात जाऊन परतली तरुणी

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरुणीने काही क्षणांतच स्वत:ला सावरले आणि ती आरामात रुग्णवाहिकेकडे स्वत: चालत गेली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला भरदिवसा उंच इमारतीवरून गवतात पडली आणि नंतर स्वतःहून उठताना दिसत आहे. इतक्या उंचावरून खाली पडल्यानंतर आता तिचं काय होईल, अशी भीती मनात येत असतानाच पुढे जे दृश्य दिसतं ते पाहून आश्चर्याचा धक्का बसेल. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव या व्हिडीओमधून मिळतो. ही तरुणी अक्षरश: मृत्यूच्या दारात जाऊन परतली.

हा व्हिडीओ @vani_mehrotra नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर तो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरलदेखील झालाय. या व्हिडीओला आतापर्यंत हजारोंमध्ये व्ह्युज मिळाले आहेत. तर, अनेकांनी या व्हिडीओला लाइक केलंय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close