सामाजिक

वर्धा जिल्ह्यात चोहीकडे बहरला बहुगुणी पळस

Spread the love

वसंत ऋतूची चाहूल, निसर्गाचा अदभूत नजराणा

*प्रतिनिधी आर्वी*

“फ्लेम आँफ द फायर”,असे खुद्द इंग्रजांनी ज्याचे वर्णन केले आहेत, तो मनमोहक व डोळ्याचे पारणे फेडणारा पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहेत. लाल,केशरी आणि काही ठिकाणी किंचित पांढऱ्या रंगाच्या फूलांनी बहरलेली पळसाची आकर्षक झाडे सध्या सर्वत्र वाटसरुचे पुरेपूर लक्ष वेधून घेत आहेत.
वस्तुतः विदर्भातील विविध भागातील डोंगर दऱ्या आणि शेतांचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने उठून व शोभून दिसत आहेत…
शिशिराची थंडी आता ओसरायला लागली. पानगळीने उघडी पडलेली वुक्षराजी नव्या, पालविचे लेणे आता अंगावर नजाकत पणे मिरवायला लागली की, वसंताची चाहूल लागते. या वसंतात फक्त रंगाची उधळण होऊन रंगोत्सव सुरू होतो. निसर्गाचा… शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला, लाल,केशरी रंगात न्हाऊन घालणारा पळस हा वर्धा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावात सर्वत्र बहरला दिसून येत आहे. वसंताचे स्वागत करण्यासाठी पळस नटलेला चोहोबाजूंनी दिसत आहेत. झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली नेत्रदीपक पळसाची फुले विस्तवाच्या गोळ्यासारखे दिसत आहेत.15ते 25 फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृत मध्ये”पलाश”म्हणतात.. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतोस.. पळसाची फुले प्रामुख्याने सरस्वती आणि कालिमाता या दोन्ही देवीच्या पुजेसाठी मुद्दाम भक्ती भावाने वापरले जातात. असा हा सुंदर पळस नागरिकांना भूरळ पाडत आहेत.
*प्रतिक्रिया*
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये पळसाच्या फुलांला अनन्यसाधारण साधारण महत्व असुन या फुलाचे वर्णन प्राचीन ग्रंथात केले आहेत. आपण जर पळसाची फुले रात्रभर पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी त्या पाण्याने स्नान केल्याने आपले त्वचा रोग दूर होतात. तसेच आपली त्वचा थंड राहते. त्याचबरोबर इतरही बहुविध औषधी गुणधर्म या मध्ये आहेत. धुलीवंदनाच्या सणासाठी नागरिकांनी केमिकल रंग वापरण्यापेक्षा पळसाच्या फुलापासून रंग तयार करून तो वापरायला हवा. वातावरणात नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात यावा, असे मला वाटते.
*अविनाश* *टाके*
पर्यावरण प्रेमी आर्वी
…………..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close