राजकिय

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का

Spread the love

नागपूर ( प्रतिनिधी) 

देशात लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे देशातील राजकारण तापले आहे. पण राज्यातील राजकारण पहिले पासूनच तापले असल्याने  राज्यात प्रत्येक दिवसात काही न काही गजडामोडी घडत आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

आमदार राजू पारवे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश घेतला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

काँग्रेसला मोठा धक्का
काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव हेदेखील उपस्थित होते. रामटेकसाठी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना संधी
काँग्रेस पक्षाची देशातील उमेदवारांची चौथी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील उमेदवारांच्या या दुसऱ्या यादीत नागपूरात नितीन गडकरी विरोधात विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी डॉ. नामदेव किरसान यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यासह भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर हे लोकसभा मतदारसंघही काँग्रेसकडे गेले आहे. काँग्रेसने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे यांनी संधी दिली आहे. तर रामटेक मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसच्या शर्यतीत ही जागा काँग्रेसने खेचली असून या जागेवर अखेर रश्मी बर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

कोण आहेत रश्मी बर्वे?
रामटेक काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे या माजी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्या पारशिवनी तालुक्यातील टेकाडी जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य असून याच टर्ममध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आरूढ होताच बर्वे या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आल्या. 2012 मध्येही त्या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढल्या होत्या. मात्र तेव्हा त्यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close