घाटंंजी बसस्थानक येथे महाराष्ट्र दिनी सफाई कामगारांचा सत्कार.
.
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार.
घाटंजी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस स्थानकात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनी येथील बस स्थानक येथील ध्वजारोहण वाहतुक नियंत्रक संजय गवई यांच्या हस्ते करण्यात आला. तर कार्यक्रमाचे संचालन वाहतुक नियंत्रक विष्णू किनाके यांनी केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने बसस्थानक स्वच्छता करणारे सफाई कामगार अशोक उदयसिंह ठाकूर, विजय नामदेव मोहिजे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बस वाहक मंगेश हुड यांनी आपले मनोगत व्यक्त करीत, सफाई कामगारामुळेच बसस्थानकातील कचरा व साफसफाई असते. सफाई कामगारांमुळे रोगराई नष्ट होते. अहोरात्र प्रयत्न करुन घराप्रमाणे आपले बसस्थान स्वच्छ रहावे अशी सफाई कामगारांची ईच्छा असते, असे मत मंगेश हुड यांनी व्यक्त केले.
यावेळी धनश्याम गिनगुले, नागेश उईके, जय मडावी, उत्तम आडे, संजय पवार, पत्रकार संतोष पोटपिल्लेवार, अरुण कांबळे, सागर सम्मनवार, चालक व वाहक यांच्यासह प्रवाशी आदीं उपस्थित होते.