क्राइम

बेलतरोडी पोलीसांची कामगिरी अवैध जनावरे वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक

Spread the love

नागपूर/ अमित वानखडे

 

बेलतरोडी पोलीसांना मिळालेले खात्रीशीर माहीती वरून जबलपुर कडुन हैद्राबाद कडे जाणा-या रोडवरुन एक ट्रक क्रमांक MH40CD5303 मधुन म्हशी जातीचे जनावरे कत्तल करण्याकरिता वाहतुक करुन येत असल्याबाबत माहीती मिळाल्यानंतर त्यांनी पांजरी टोल नाका येथुन सापळा रचुन शिताफीने ट्रक क्रमांक MH40CD5303 चे चालक नामे १) शेख महेबुब शेख उस्मान, वय ५७ वर्ष, रा. लाल झेडा चौक, यशोधरा नगर, नागपुर व वाहक नामे २) शेख सलाम शेख अहेमद कुरेशी, वय २७ वर्षे, रा. शारदा कंपनी चौक महेंद्र नगर, यशोधरानगर, नागपुर, ३) राहुल रामेश्वर मडावी, वय २८ वर्षे, रा. बमनी, पोस्ट कानेवाडा, जि. शिवनी, म.प्र यांना ताब्यात घेतले नमुद तीनही आरोपी यांनी आपले ट्रक मध्ये २१ म्हशी जातीचे जनावरे ज्यामध्ये १७ म्हशी व ०४ हेले असे म्हशी जातीचे जनावरे किंमती अंदाजे ५,२५,०००/- रुपये चे त्यांना अमानुषपणे निर्दयतेने दोरीने बांधुन कुरतेने कोंबुन डांबुन घेवुन जातांना मिळुन आल्याने यातील आरोपीतांविरुद्ध ११(१) (ड) पशु करता अधिनीयम, सह कलम ८३ / १७७ मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोदं करुन गुन्हयात वापरलेला टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH40CD5303 कि. १८,००,००० /- रुपये, असा एकुण २३,२५,०००/- रुपयेचा चा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच एकुण २१ म्हशी जातीची जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टिने सुकृत गौशाळा, कल्याकारी संस्था, खैरी, ता. लाखनी, भंडारा येथे दाखल करण्यात आले

सदर प्रकरणी तपास पथकाचे खात्रीशिर बातमीदार यांचेकडुन मिळालेल्या माहीतीचे आधारे मा. श्री विजयकांत सागर साहेब, पोलिस उपआयुक्त परी कं. ०४, नागपुर शहर, मा. श्री गणेश बिरादार साहेब, सहा पोलिस आयुक्त अजनी विभाग, नागपुर शहर यांचे मार्गदर्शनामध्ये श्रीमती वैजयंती जे मंडवधरे वरीष्ठ पोलिस निरिक्षक, श्री संदीप बुआ पोलिस निरिक्षक (गुन्हे), अनिल मेश्राम सहा. पोलिस निरिक्षक, पोलीस हवालदार अविनाश अ. ठाकरे, शैलेश बडोदेकर, मनिश धुर्वे, प्रशांत गजभिये, तेजराम देवळे, ना.पो.अं. सुहास शिंगणे, कमलेश गणेर, प्रशात सोनुलकर, मंगेश देशमुख, पोलीस शिपाई विवेक श्रीपाद, कुणाल लांडगे, निश्चय बढीये सर्व पोस्टे बेलतरोडी नागपुर शहर यांनी केली

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close