वहिनीवर जडले प्रेम मोठ्या भावाचा केला गेम
नागपूर / नवप्रहार डेस्क
वहिनी सोबत सुत जुळल्याने लहान भावाने शेतीत जाणे सोडले होते. तो अधिक वेळ घरातच घालवत होता. त्यामुळे मोठ्या भावाला पत्नी आणि लहान भावावर संशय आला. त्यामुळे तो दुसरीकडे राहू लागला. नवरा- बायकोचे प्रेम पुन्हा बहरले.दरम्यान त्यांना एक बाळ देखील झाले. त्यामुळे तो पत्नीला घेऊन पुन्हा घरी राहू लागाला. सॊबत राहत असल्याने दिर आणि वहिनीचे प्रेम पुन्हा उफाळून आले. मोठ्या भावाने पत्नी आणि लहान भावाला एकाच ठिकाणी पाहिले. यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे लहान भावाने मित्राच्या मदतीने मोठ्या भावावर कुऱ्हाडीने वार करत खून केला.
सत्येंद्र आणि संदीप असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सत्येंद्र आणि जीतेश हे दोघे भाऊ. काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सधन शेतकरी. दोघांनीही शेती कसून पैसा गोळा केला. शेतीच्या कामात दोघेही भावंडांनी लग्न केले नव्हते. शेवटी एका नातेवाईकांच्या मदतीने ३५ वर्षीय मोठा भाऊ याचे तीन वर्षांपूर्वी एका नातेवाईक तरुणीशी लग्न झाले.
ती तरुणी नातेवाईक असल्यामुळे दोघेही भाऊ तिला लग्नाच्या पूर्वीपासून ओळखत होते. जीतेशचे मोठ्या थाटात लग्न झाले. सर्व काही सुरळीत सुरु होते. मोठ्या भावाने स्वत:चा संसार थाटला. घरातील वातावरण आनंदात होते. मात्र, काही महिन्यानंतर सत्येंद्रचे वहिणी जया(काल्पनिक नाव) हिच्याशी सूत जुळले.
दोघेही समवयस्क असल्यामुळे दोघांचे घरातही चांगले पटत होते. त्यामुळे घरात कुणालाही त्यांच्या संबंधाबाबत संशय नव्हता. परंतु, काही महिन्यांतर वहिणी आणि दिरामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. नेहमी शेतात कामावर जाणारा सत्येंद्र शेतात जात नव्हता. अनेकदा तो घरात एकटाच राहत होता. त्यामुळे मोठ्या भावाला दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत थोडी जाणीव झाली.
बायको आणि भाऊ दिसले एकाच खोलीत
मोठा भाऊ शेतात गेल्यानंतर वहिणी आणि दिर दोघेही एकाच खोलीत बसलेले होते. त्यादरम्यान, शेतात गेलेला भाऊ तासाभरात परत आला. तो घरात गेला असता दोघांनाही त्याने एकाच खोलीत बघितले. त्याने बायकोला जाब विचारला असता डोळ्यातील कचरा दिर काढून देत असल्याचे तिने सांगितले. मात्र, बायकोच्या चारित्र्यावर त्याला संशय आला. त्याने दुसऱ्या दिवशी घर सोडले आणि दुसरीकडे राहायला गेला. पती-पत्नीत पुन्हा चांगले संबंध निर्माण झाले. त्यांना बाळ झाले. सुखी संसार पुन्हा सुरु होता.
घरी परत आला अन घात झाला
दोन वर्षे बाहेरगावी राहणारा जीतेश हा पत्नी व बाळासह पुन्हा गावी परतला. शेती करायला लागला. यादरम्यान वहिणी आणि दिराचे पुन्हा प्रेम फुलले. मोठ्या भावाने पत्नी व भावाला दोघांनाही मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या भावाने मित्र संदीप याच्या मदतीने संपविण्याचा कट रचला. भाऊ रात्रीला शेतात गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे दोघेही गेेले. त्यांनी जीतेशचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला. काटोल पोलिसांनी मात्र २४ तासांच हत्याकांड उघडकीस आणले. दोन्ही आरोपीस अटक केली.