शाशकीय

एक लाख नवमतदार नोंदणीचा संकल्प – डॉ. विपीन इटनकर

Spread the love

अचूक मतदार यादी करण्यास प्राधान्य

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
नागपूर, : छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत सुमारे 70 हजार ते 1 लाख नवमतदारांची नोंदणी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प आहे. यासोबतच मतदार यादी अचूक करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिका-यांनी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यावेळी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जून ते 16 आक्टोबर 2023 पर्यंत पुनरीक्षण पूर्व कार्यक्रम निर्धारित करण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदार यादी व 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावयाची आहे. 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. नागरिकांना https://www.nvsp.in अथवा https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येणार आहे. तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफलाईन दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. 70 हजार ते एक लाख नवमतदार जोडण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प असल्याचे श्री. इटनकर यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close