ब्रेकिंग न्यूज

अल्टो कार झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू….तीन जण गंभीर जखमी….

Spread the love
मित्राचा वाढदिवस  साजरा करून परतत असताना घडला अपघात 
   कोरंभी – पिडकेपार ते भंडारा वळण मार्गावरील घटना
जवाहरनगर ( भंडारा)  / सागर बागडे
 भंडाऱ्याच्या दिशेने येणारी मारुती अल्टो कार क्रमांक  एम.एच. ४० सी. एच.८५१८ अनियंत्रित झाल्याने वळण मार्गावरील रस्त्यालगतच्या  बाभळीच्या झाडावर धडकली. या भीषण अपघातात वाहनातील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, ३  जण गंभीर जखमी असल्याची घटना काल २९ व ३० नोव्हेंबर च्या  मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली. प्रणय राष्ट्रपाल सुखदेवे (२३) रा. कोरंभी (देवी), राजेश शिंगाडे (२५) रा. नवेगाव या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, अमर बोरकर (२२), हर्षल उर्फ बंटी सुखदेवे (२३) आणि अक्षय कांबळे (२४) हे तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हर्षल  उर्फ बंटी सुखदेव याचा वाढदिवस असल्यानं हे सर्व वाढदिवसाची पार्टी आटोपून  भंडाराकडे परत येत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती  आहे.
गंभीर जखमी तील २ जण(देवी) कोरंभी  व १ जण बेला येथील रहिवाशी आहे.या तिघांचे उपचार भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास भंडारा पोलिस करीत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close