विमा कंपनीच्या मॅनेजर चा अर्धनग्न मृतदेह सापडला
भोपाळ / नवप्रहार डेस्क
एका खाजगी विमा कंपनीच्या महिला मॅनेजर चा मृतदेह तिच्या फ्लॅट मध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. मृत महिलेच्या मोबाईल वर तिच्या आईकडून कॉल करण्यात येत होते. पण पलीकडून उत्तर मिळत नसल्याने आईला संशय आला. तिने घरमालकाला कॉल करून माहिती दिली. घरमालकाने दार ठोटाऊन आणि अनेक आवाज देऊन देखील कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी पोलिसांना कल्पना देण्यात आली.
पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केल्यावर ही तरुणी अर्धनग्न अवस्थेत पलंगा खाली पडून असल्याचे दिसले. तिच्या तोंडातून फेस येत होता आणि बाजूला।उलटी सुद्धा पडली होती. पण फ्लॅट मध्ये विषारी औषधांचे रॅपर , पॉकेट किंवा बाटली सापडली नाही. त्यामुळे पोलिसांची शंका बळावली आहे. आणि पोलीस त्या दिशेने तपास करणार आहेत.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या अवधपुरी परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमधून इश्योरन्स कंपनीच्या महिला मॅनेजर नेहा हीच मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडली आहे. या महिलेचा मृतदेह तिच्या राजगढ या गावी नेण्यात आला असून त्याच्यावर तिच्या नातेवाईकांनी अंत्य संस्कार देखील केले आहे.
भोपाळ पोलिसांना पोस्टमार्टेमनंतर नेहाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सोपवला होता. आता पोलिसांचे लक्ष पोस्टमार्टेमचा अहवाल काय येतो याकडे लागले आहे. म्हणजे नेहाच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. कारण तिचा मृतदेह संशयास्पद रित्या सापडला होता.
अवधपुरी येथील निर्मल पॅलेस येथील एका घरात नेहा विजयवर्गीय ( 36) दुसऱ्या मजल्यावर रहात होती. नेहा नर्मदापुरम रोड येथे असलेल्या एका खाजगी इंश्योरन्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होती. ती गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होती.
22 ऑक्टोबर रोजी नेहाची आई तिला कॉल करीत होती. परंतू नेहा फोन उचलत नव्हती. नेहाच्या आईने तिच्या फ्लॅटच्या खाली रहाणाऱ्या घरमालकाला यांसंदर्भात सांगत चौकशी करायला सांगितले. जेव्हा घरमालक नेहाच्या फ्लॅटजवळ गेला तेव्हा त्याला फ्लॅटचा दरवाजा आतून लॉक असलेला आढळला. त्याने बराच वेळ दरवाजा वाजवला आणि आवाज देऊन पाहीला मात्र दरवाजा काही केल्या उघडला गेला नसल्याचे त्याने अवधपुरी पोलिसांना या बाबत तक्रार केली. जेव्हा पोलिसांची टीम तेथे दाखल झाली. तेव्हा दरवाजा तोडण्यात आला.
नेहा अर्धनग्नावस्थेत निपचित पडली होती
तेव्हा नेहा पलंगाच्या खाली अर्धनग्नावस्थे पडलेली आढळली. नेहाच्या तोंडातून फेस आलेला होता. उलटी देखील झालेली दिसत होती. तिने विष खाऊन आत्महत्या केलेली असावी असा संशय आहे.परंतू फ्लॅटच्या आत कोणतीही बाटली किंवा विषारी पदार्थाचा रॅपर किंवा पाकिट सापडलेले नाही किंवा कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.त्यामुळे या प्रकरणात संशय वाढलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढण्यासाठी तपास सुरु केला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टेम करुन नातेवाईकांकडे सोपवले आहे. सध्या पोलिस पोस्टमार्टेमच्या अहवालाची वाट पाहात आहेत. त्यानंतरच तपासाला योग्य दिशा मिळू शकणार आहे.