हटके

जिवलग मैत्रिणीत राडा , एकीने दुसरीवर केला चाकू हल्ला

Spread the love

पुणे / विशेष प्रतिनिधी

                 कोरेगाव परिसरात दोन जिवलग मैत्रिणीत पाहायला येणाऱ्या पाहुण्यांना नकार देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकीने दुसरीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी तरुणीला रुग्णालयात भरती केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र मारहाणीचे कारण ऐकून पोलीसही काही काळ चक्रावून गेले.

या प्रकरणी शितल नावाच्या 29 वर्षांच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिच्या अश्विनी नावाच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील दरवडे मळा परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल आणि अश्विनी दोघीही दरवडे मळा परिसरात जवळच राहतात. दोघीही 29 वर्षांच्या असून नोकरी करतात आणि अनेक वर्षांपासून जवळच्या मैत्रिणी आहेत. अश्विनीच्या घरी लग्नासाठी पाहुणे येणार होते. मात्र अश्विनीला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे तिने शितलला सांगितले की पाहुण्यांना येऊ नका असे सांग. मात्र शितलने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

याच गोष्टीचा राग अश्विनीच्या मनात होता. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोघींची भेट झाली. यावेळी पुन्हा लग्नाच्या विषयावरून त्यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर अश्विनीने शितलला हाताने मारहाण केली आणि तिचा गळा पकडला. त्यानंतर हातातील चाकूने शितलच्या हातावर आणि गळ्याजवळ वार करून तिला गंभीर जखमी केले.

जखमी अवस्थेत शितलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बढे करत आहेत. मैत्रीच्या नात्यातून घडलेली ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close