हटके

फेमस होण्यासाठी तिने सोशल मीडियावर केले असे काही की आता खात आहे युजर्स च्या शिव्या 

Spread the love
 

नवी दिल्ली  / विशेष प्रतिनिधी 

               अलीकडे तरुणाईत सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ वाढली आहे. व्हिडिओला काही लाईक्स आणि शेअर मिळविण्यासाठी तरुणाई वाट्टेल ते करायला तयार आहे. काही नवीन लग्न झालेले जोडपे तर या लाईक्स च्या नादात फस्ट नाईट चे बेडरूम सीन्स चे व्हिडीओ आणि रिल्स बनवून ते सोशल मीडियावर टाकत आहेत. अश्याच प्रसिद्धीच्या नादात एका तरुणीने असे काही कृत्य केले की युजर्स तिला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. चला तर पाहू या या तरुणीने असे केले तरी काय ?

गेल्या अनेक दिवसांपासून, तुम्ही कंटेंट क्रिएटर्स मर्यादा ओलांडत रील बनवताना पाहत असाल. मुलं-मुली उघडपणे आक्षेपार्ह मजकूर तयार करत आहेत, त्याचा तरुण प्रेक्षकांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचारही ते करत नाहीत. आता या मुलीने शेअर केलेला व्हिडीओ पाहा. या मुलीने असं काही केलं की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. एका मादी कुत्र्यासोबत तिनं अत्यंत घृणास्पद कृत्य केलं.

@JaikyYadav16 या ट्विटर अकाऊंटवर या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ही मुलगी रील बनवण्यासाठी कुत्र्याचं दूध पीत आहे. व्हिडीओ इतका वाईट आहे की आम्ही तुम्हाला तो दाखवूही शकत नाही. त्यामुळे बातमीचा फोटोदेखील आम्ही ब्लर केला आहे.

या पोस्टवर कमेंट करताना एका युझरने मुलीचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओवर सामान्यपणे लोकांची दोन मतं असतात. कुणाला व्हिडीओ चांगले वाटतात तर कुणाला ते बिलकुल आवडत नाहीत. या मुलीच्या कृतीकडे तुम्ही कसंही बघितलं तरी प्रत्येक परिस्थितीत ती अयोग्य वाटते. तुमची या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

या मुलीवर सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युझरने म्हटलं की, रीलने लोकांची तर्कशुद्धता नष्ट केली आहे. तर एका युझरने स्वस्त प्रसिद्धीसाठी असे व्हिडिओ बनवतात, असं म्हटलं आहे. एका व्यक्तीने तर पेटा ते पोलीस सगळ्यांना टॅग करून या मुलीला अटक करण्याची मागणी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close