अप्पर वर्धा जलाशयातुन ११ दरवाजे ८०सेंटीमीटर उघडले असून १३३५ क्यूसेक विसर्ग सुरू, वर्धा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतत तिचा इशारा
मोर्शी( संजय गारपवार)दि.२२/७
अप्पर वर्धा जलाशयातुन ११ दरवाजे ८०सेंटीमीटर उघडले असून १३३५ क्यूसेक विसर्ग सुरू, वर्धा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतत तिचा इशारा
पश्चिम विदर्भाला वरदान असलेले अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिभोरा येथील अप्पर वर्धा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून सततधार सुरू असून जलाशयात येणाऱ्या माळू नदी ,दमयंती नदी ,वर्धा नदी , जाम नदी , चुडामण नदी ,सतत पुर सुरू असल्याने जलाशयाच्या पातळीत पाण्याची झपाट्याने वाढ झाल्याने शुक्रवारी
सायंकाळी ७ वाजता ७दरवाजे उघडले होते. जलाशयात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात होत असल्याने रात्री ११ वाजता अप्पर वर्धा जलाशयाचे १३दरवाजे पैकी ११ वक्र दरवाजे उघडण्यात आले असून वर्धा नदी पात्रात विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती अप्पर वर्धा धरण विभागाच्या उपविभागीय अभियंता मनाली नांदगवळी यांनी दिली आहे
दि३१ जुलै अखेर जलाशयात पाण्याची ३४१.२० मीटर धरणातील पाण्याचा तालंक , धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा ४५२.६६ द ल घ मी, टक्केवारी ८०.२५ पाहिजे असून दि. २२ जुलै रोजी धरणातील पाण्याचा साठा ३४०.२० मीटर इतकी आहे. धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा ३८३.४२ , आणि धरणातील पाण्याची टक्केवारी ७०% झाले .अप्पर वर्धा जलाशयाचे ११ वक्र दरवाजे उघडण्यात आल्याने शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने धरणाचे व्यंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करणार आहेत.