शेती विषयक

शेती पंपाला 24 तास वीज मिळण्याच्या मागणी करता वीज वितरण कंपनी समोर शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन……

Spread the love

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपत आहेत. पिकांना पंपाद्वारे पाणी देणे आवश्यक असताना शेतीला रात्रीचा वीज पुरवठा केला जातो.त्यातही लोडशेडिंगचा फटका बसत आहे. शेती पंपाला दिवसा विज पुरवठा व्हावा म्हणून संघटनेच्या वतीने माननीय तहसीलदार अंजनगाव सुर्जी यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर काहीच कार्यवाही न झाल्यामुळे आणि दिवसेंदिवस उन्हाचा ताप वाढत असल्यामुळे आज एक सप्टेंबर 2023 पासून शेती पंपाला 24 तास वीज पुरवठा मिळावा म्हणून व इतर समस्यांच्या निराकरणाकरिता शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी 11 वाजेपासून दिवसभरात ठीया आंदोलन करण्यात आले.या जन आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे तालुकाध्यक्ष संजय हाडोळे,स्वभाप चे तालुकाध्यक्ष गजानन पाटील दुधाट,वीराआस समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील साबळे,देविदास पाटील ढोक अशोकराव गीते, सुरेश महाराज मानकर मनोहर रेचे किशोर पाटील काळमेघ, गणेश राव चिंचोळकर मधुकर मोरे ओमप्रकाश मुरतकर संजय हिंगे,अरुण गोडंचोर विलास धुमाळे हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनात दिवसभरात अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भेटी देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा राहणार आहे.आणि यामधून मोठे जनआंदोलन उभे होऊ शकते याची चाहूल तालुक्याला लागलेली आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना राष्ट्राच्या विविध जाचकटीला कंटाळून त्यामध्येही नैसर्गिक साधन भेटत नसल्यामुळे शेतकरी पहिलेच हैराण झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा वितरण कंपनी शेतकऱ्याचा अतोनात छळ करीत आहे.विदर्भात वीज निर्माण होत असताना सुद्धा विदर्भातीलशेतकऱ्यांना पुरेशी वीज नाही ही शोकांतीका आहे.
या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देऊन उपस्थिती दर्शवणाऱ्यामध्ये गजानन पाटील काळमेघ भारतीय किसान मोर्चा चे कार्यकारिणी सदस्य, मनोहरराव मुरकुटे शहराध्यक्ष भाजप, डॉक्टर कविटकर सामाजिक कार्यकर्ते, प्रमोद पाटील दाळू, तालुकाध्यक्ष काँग्रेस, अभिजित अभ्यँकर आरपीआय तालुका निरीक्षक, नितीन पोटदुखे आरपीआय तालुका अध्यक्ष, किरण दादा गिरे, जिल्हा मार्गदर्शक समता परिषद, शिवसेनेचे पदाधिकारी,विकास येवले, महेश खारोडे यांनी ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
कार्यकारी अभियंता अचलपूर यांनी भेट दिली व चर्चा केली असता कोणत्याच प्रकारचा तोडगा निघाला नाही जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत हे या आंदोलन सुरूच राहणार असे आयोजकांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close