सामाजिक

महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटना (शासन मान्यता) धरणे आंदोलन

Spread the love

मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/ अधिकारी संघटना (शासन मान्यता) संघटनेचे धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई इथे करण्यात आले .
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शासन मान्यता प्राप्त संघटनेचे खालील मागणी आहे .
दिव्यांगांची संख्या विचारात घेऊन दिव्यांग प्रतिनिधी राज्यपाल यांच्या कोट्यातील एक जागेवर देण्याची शिफारस करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालय च्या निर्देशानुसार इतर राज्याच्या धरतीवर वर्ग १ (class 1) व वर्ग २ (class 2) पदास आरक्षण मंजूर तत्काळ करावे विशेष बाब म्हणून दिव्यांग कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मंजूर करण्यात यावी व दिव्यांग वाहतूक भत्ता 5000 रुपये इतका देण्यात यावा
मुंबई येथे आझाद मैदानावर दिनांक १० ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता धरणे आंदोलन सुरू झाले सभेत मंचकावर उपस्थित संघटनेचे राज्य पदाधिकारी, संस्थापक मा.दिगंबरजी घाडगे पाटील साहेब,मा. परमेश्वरजी बाबर साहेब,मा.साईनाथदादा पवार साहेब, मा.रविन्द्रजी पाटील साहेब, मा.विलासदादा भोतमांगे,मा.ललितदादा सोनवणे, मा.संतोषदादा सरवदे व मा. संजय बरडे मान्यवरांच्या उपस्थिती होती या धरणे आंदोलनाच्या वेळेस मनोगत व्यक्त करतांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटना शाखा (विद्युत विभाग महावितरण महापारेषण महानिर्मिती) शासन मान्यता प्राप्त संघटनेचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले महावितरण सर्व कार्यालयत दिव्यांगांसाठी रॅम्प नाही, लिफ्ट नाही , टॉयलेट्स नाहीत (दिव्यांग अधिनियम 45) व दिव्यांगांना मानसिक त्रास दिल्या जातो. सर्वोच्च न्यायालय च्या निर्देशानुसार दिव्यांगांचे पदोन्नतीचे परिपत्रक अजून पर्यंत निघालेली नाही व दिव्यांगांना पदोन्नती पासून वंचित ठेवण्यात येते (दिव्यांग अधिनियम 20) व सहाय्यक तंत्रज्ञान अर्ज अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत . या धरणे आंदोलन माहिती माननीय ऊर्जामंत्री कार्यालय मुंबई व मुख्य कार्यालय मुंबई ईमेल द्वारे देण्यात आली होती . शासनाने या धरणे आंदोलनाची दखल घ्यावी व दिव्यांग कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
यावेळेस महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा विद्युत विभाग मुंबई 32 यांचे कार्यकारणी सदस्य श्री मनोज माने, श्री हरिदास बेलूरकर , श्री अमोल काळे, श्री प्रशांत शिंदे ,श्री देशपांडे, श्री कमलाकर हाके. यावेळेस अनेक जिल्हाध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचे (शासनमान्य मुंबई 32) सभासद मोठ्या संख्येने दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close