तिने त्याला हॉटेल मध्ये एकट्यात भेटायला बोलावले अन….

अहमदाबाद / नवप्रहार डेस्क
देशात काही राज्य असे आहेत ज्यात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अत्यंत कमी असल्याने मुलांच्या लग्नासाठी त्याच्या कुटुंबियांना खूप स्थळ शोधावे लागतात. तरी देखील मुली मिळत नाही. मुलांच्या कुटुंबियांच्या या अडचणीचा फायदा घेत काही दलाल सक्रिय झाले आहेत. हे मुलांच्या कुटुंबियांकडून रक्कम घेऊन त्यांना स्थळ दाखवतात.
पण यात देखील मुलांच्या कुटुंबियांची फसगत होते. कारण हे दलाल अश्या मुलीसोबत मुलाचे लग्न लावून देतात आणि या मुली लग्नाचे दागिने आणि घरातील रक्कम घेऊन पसार होतात. मुलाकडील मंडळी लाजेखातर पोलिसात जात नाही. एखादं दुसरे तक्रार करतात पण काय झाले याबद्दल विचारणा करत नाही.अहमदाबाद मध्ये अशीच घटना घडली आहे.
अहमदाबादमध्ये एका मुलाचं लग्न ठरवणं सुरू होतं. पालकांनी अनेक स्थळंदेखील पाहिती होती. मुलाच्या पालकांनी काही मुलींचे फोटो पाहिले होते, पण त्या फोटोंपैकी एक फोटो मुलाच्या आयुष्यात मोठं संकट घेऊन येईल, हे कुणालाच ठाऊक नव्हतं.
त्यादिवशी एका मुलीने त्या मुलाला फोन केला आणि हॉटेलमध्ये एकांतात भेटायला बोलावलं. मुलगा गेला आणि त्याच्या आयुष्यात मोठी अडचण निर्माण झाली.
या प्रकरणात गुजरातमधील अहमदाबाद शहराच्या क्राईम ब्रँच पोलिसांनी महेसाणा येथील रहिवाशाकडून 2 लाख रुपये उकळल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. आरोपींपैकी एक 54 वर्षांचा पुरुष सारसपूरचा आहे आणि 24 वर्षांची महिला चांदलोडियाची रहिवासी आहे. क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 10 ऑक्टोबरला आरोपींनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी स्थळ दाखवण्याच्या बहाण्याने मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता.
आरोपींनी मुलाच्या कुटुंबाला काही संभाव्य वधूंचे फोटो दाखवले. त्यानंतर त्या मुलींपैकी एकीने मुलाच्या पालकांशी संपर्क साधला. मुलगी मुलाशी बोलू लागली. मुलाच्या पालकांनी स्थळ पाहिलेले असतानाही, त्या मुलीने स्वतःहून मुलाच्या आयुष्यात खास रस दाखवला आणि एकांतात भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं.
मुलगा त्या मुलीच्या बोलावण्यावर हॉटेलमध्ये भेटायला गेला. पोलिस तक्रारीनुसार गांधीनगरच्या आदळज पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, महेसाणाच्या रहिवाशाला हॉटेलमध्ये भेटल्यानंतर मुलीने त्यांच्या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ तयार केला. नंतर मुलीने व्हिडिओ कुटुंबाला दाखवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरू केलं.
मुलीने मुलाला धमकी दिली की, 2 लाख रुपये दिले नाहीत तर ती हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन. मुलाने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्रारंभिक 2 लाख रुपये दिल्यानंतर आरोपींनी अजून 5 लाख रुपयांची मागणी केली. या ठिकाणी पीडित मुलाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपींच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली.