सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा, मित्रांनो सापांना वाचवा, सर्पमित्राचे आवाहन
नेर:-नवनाथ दरोई
शेती पर्यावरण, मानवी जीवनात सापाचे महत्त्वाचे योगदान आहे. म्हणूनच नागपंचमीला शेतकरी शेतातील वारुळा जवळ जाऊन त्या वारुळातील सापाची मनोभावे पूजा अर्चा करतात. गारुड्याने घरासमोर आणलेल्या नागाला सुद्धा महिला दूध पाजतात. परंतु दुसऱ्या दिवशी साप घरात दिसला रे दिसला की, त्याला बिळातून काढून त्यांची हत्या केली जाते.साप शेतकऱ्याचा शत्रू नसून मित्र आहे. शेतातील अन्नधान्याची नासाडी करणारा उंदीर, घूस यांना खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून घरातील धान्याची नासाडी थांबवते. आजच्या वैज्ञानिक युगात साप, विंचू चावल्यास किंवा कॅन्सर, अस्तानी, दमा, किंवा दुर्घटनेत झालेल्या अपघातातील व्यक्तीचा रक्तस्त्राव न थांबल्यास वरील आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील सर्वात विषारी असलेले नाग,मन्यार, घोणस,फूरसे च्या सापाच्या विषापासून तयार होणारे औषधी यासाठी उपयोगात आणली जाते. जगात सापाविषयी अनेक अंधश्रद्धा पसरविण्यात आल्या. साप दूध पितो,तो बदला घेतो, शंभर वर्ष जगतो,संगीतावर डोलतो, धनाची रक्षा करतो, सिनेमात दाखवल्याप्रमाणे, शंभर वर्षे जगल्यावर तो इच्छाधारी नाग, नागिन बनून कोणाचेही शरीर धारण करू शकते. सापाने कात टाकली की तो तरुण होतो. परंतु सापाविषयीच्या वरील कल्पना साफ खोटया आहे. साप दूध पीत नाही,तो बदला घेत नाही,शंभर वर्षे तर जगतच नाही,संगीतावर न डोलता गारुडयाच्या हाताच्या हालचाली वर फना फिरवतो,धनाची रक्षा तर मुळीच करत नाही,सापाला फार काळ आयुष्य नसल्याने तो एवढे वर्ष जगू शकत नाही. सापाबद्ल जनतेत असे अनेक गैरसमज पसरविण्यात आले.नेर येथील हनुमान नगरातील नईम ठेकेदार यांच्या घराच्या मागच्या प्लॉटमध्ये धामण नावाचा साप आढळून आला असता, शिबू याने सर्पमित्र प्रदीप झोडापे यांना फोन करून बोलावण्यात आले. सर्पमित्र प्रदिप झोडापे यांनी त्या धामन नावाच्या सापाला पकडून प्ल्यास्टीकच्या भरणीत बंद करुन जगलात सोडण्यात आले. साप पकडल्यानंतर सापाबद्दल सर्पमित्राला माहिती विचारली असता त्यांनी वरील माहिती कथन केली. पुढे ते असे म्हणाले की कुठेही, कुठलाही जातीचा साप निघाल्यास त्याला ड्युचू नका, मारू नका, आमच्या एम एच हेल्पिंगवर संपर्क करा.