राजकिय

मुख्यमंत्री पदाची प्रतीक्षा वाढली ? दिल्ली वरून फोन आलाच नाही 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

                     राज्यात मुख्यमंत्री पदाची माल कोणाच्या गळ्यात पडते हे पाहण्यासाठी अजून दोन दिवस वाट पहावी लागणार आहे. कारण दिल्लीवरून कॉल आल्यानंतर आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत खातेवाताप सह अन्य विषयांवर चर्चा होणार होती पण आजची बैठक रद्द झाल्याने जनतेची उत्कंठा वाढली आहे.

मुंबईमधील बैठकीत मुख्यमंत्रि‍पदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता होती. त्याशिवाय कोणाला कोणतं मंत्रीपद दिले जाणार? हेही निश्चित होणार होतं. महायुतीमधील मुख्यमंत्रि‍पदाची पेच आणखी वाढला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत होणारी बैठक रद्द झाली आहे. आज होणारी बैठक 2 दिवसांनी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर शिवसेना आमदारांची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आळी आहे.

 

 

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल रात्री अमित शाह यांच्याकडे प्रस्ताव दिले होते. त्या प्रस्तावावर विचार करून अमित शाह हे या दोन्ही नेत्यांना फोन करणार होते. त्या फोन नंतर राज्यातील तीन नेते एकत्र बसून निर्णय घेणार होते. मात्र अद्यापपर्यंत फोन न आल्याने बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जातेय. आता ही बैठक 2 दिवसानंतर होईल अशी चर्चा आहे.

दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात घडामोडींना येणार वेग

महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी येत्या २ दिवसात अनेक आमदार, नेते मुंबईत वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या मंत्रिपदासाठी महायुतीमधील अनेकांचे लॉबिंग सुरू झालेय. मुख्यमंत्री पद सोडून इतर मंत्रिपदं मिळावी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोणाला कुठल्या मंत्रिपदाची अपेक्षा

भाजप: गृह, ग्रामविकास, महसूल, सामान्य प्रशासन, गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम

राष्ट्रवादी काँग्रेस: अर्थ, महिला व बालकल्याण, अल्पसंख्याक विकास, वैद्यकीय शिक्षण, मदत व पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास

शिवसेना: गृह, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, नगरविकास, आरोग्य, सांस्कृतिक, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close