हटके

गावातील रस्ते सूनसान : घरातून रडण्याचा आवाज नेमक झालं काय ? वाचा 

Spread the love
राजस्थान / नवप्रहर डेस्क 
                  पावसाळ्याच्या दिवसात नदी आणि समुद्रा किनारी अनेक अपघात घडतात. फक्त याच ठिकाणी नाही तर
धबधब्याच्या ठिकाणी देखील अपघात घडतात. त्यामागील कारण म्हणजे ऐकतर अचानक पाण्याची पातळी वाढते. किंवा मस्तीच्या मूळ मध्ये असलेल्या लोकांना पाण्याचा अंदाज येत नाही . आणि लोक जीव गमावून बसतात. अशीच घटना राजस्थान क्या भरतपूर येथे घडली आहे. येथील बानगंगा नदीवरील गेलेल्या ८ तरूनांपैकी ७ तरुणांचा मृत्यू झाला आहे. एक कसाबसा वाचला आहे. मृत तरुणांमध्ये दोन विवाहित होते.
                    काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेबाबत अधिक माहिती अशी की ,पवन जाटव (20)  उदय सिंह. यांचा मुलगा, सौरभ जाटव (14) प तान सिंह यांचा मुलगा , भूपेंद्र जाटव (18) दशरथ यांचा मुलगा , शांतनु जाटव (18)  खेमसिंह यांचा मुलगा , लक्की जाटव (20) पु प्रीतम सिंह यांचा मुलगा, पवन सिंह जाटव (22) सुगनसिंह यांचा मुलगा आणि  गौरव जाटव (16)  प्रकाश यांचा मुलगा हे बाणगंगा नदीवर गेले होते.
                यातील ७ तरुणांचा मृत्यू झाला आहे. जगविर नावाचा मुलगा या घटनेतून वाचला आहे. अचानक नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.  यातील दोन युवक विवाहित असून त्यांना एक एक मुलगी आहे.  गावातील सात तरुणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने सगळे गाव स्तब्ध आहे. गावातील रस्ते सूनसान आहेत. तर ज्यांनी कुटुंबातील सदस्य गमावला त्यांच्या घरी विलाप सुरू आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close