सामाजिक

निघोज येथे श्रीनाथ समर्थ हेल्थकेअर चा धुमधडाक्यात शुभारंभ .

Spread the love

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर तालुक्यातील निघोज येथे प्रसिद्ध ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर तज्ञ अशोक खोसे संचलित श्रीनाथ समर्थ हेल्थ केअर या सेंटरचा शुभारंभ राज्यातील कन्हैया उद्योग समुहाचे अध्यक्ष शांताराम लंके व सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर तज्ञ डॉ योगेश कर्नावट आणि डॉ . सौ . प्रियंका कर्नावट यांच्या शुभ हस्ते करण्यात आला .
या शुभारंभ प्रसंगी पारनेर तालुक्यातील अनेक आजारांनी त्रस्त असलेले मान , पाठ , कंबर , खांदे , गुडघे,टाच दुखी ,सायटिका ,स्लिप डिस्क संधिवात या आजारांवर ॲक्युप्रेशर , ॲक्युपंचर, सु -जोक कपिंग, कायरोप्रॅक्टिक , रोप बेल्ट थेरपी, बायोकेम , बॅच प्लॉवर ही थेरपी व लहान मुलांचे आजार ,छातीचे , विकार पोटाचे विकार, त्वचारोग , मुळव्याध केस गळणे , झोप न येणे, मानसिक ताणतणाव, स्त्रियांचे सर्व आजार , वजन वाढवणे व कमी करणे,अर्धशिशी डोकेदुखी दाढ दुखी अशा विविध आजारांवर होमिओपॅथी पद्धतीने तेही शुभारंभ प्रसंगी मोफत उपचार शिबीर आयोजीत केल्याने पारनेर तालुक्यातून शेकडो रुग्णांनी अक्षरशः गर्दी केली .
डॉ . योगेश कर्नावट व डॉ . सौ . योगेश कर्नावट हे सपत्नीक महाराष्ट्र राज्यात निसर्गोपचार , ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत , त्यांनी या थेरपीचा वापर करून लाखो रुग्ण बरे केले आहेत . त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुळचे पाडळी दर्या चे व पुणे येथे कार्यरत असलेले निसर्गोपचार , योगोपचार , ॲक्युपंक्चर तज्ञ अशोक खोसे व त्यांचे सहकारी होमियोपॅथी तज्ञ डॉ . किर्ती सासवडे व एम के गावडे यांनी निघोज येथे ” श्रीनाथ समर्थ हेल्थ केअर ” सुरू करून परिसरातील अनेक रुग्णांची नाम मात्र दरात प्रत्येक शनिवारी सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे .
या शुभारंभ प्रसंगी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद , माजी सरपंच ठकाराम लंके , संदीप पाटील जनसेवा फाऊन्डेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ , सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर , पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे , श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे सल्लागार रुपेश ढवण , तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष मंगेश लाळगे , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील , पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे , उपाध्यक्ष भास्करराव कवाद , पत्रकार संघाचे निघोज शहराध्यक्ष सचिन जाधव , पत्रकार सौ . निलम खोसे पाटील , संपतराव वैरागर , आनंदा भुकन , महागणपती मल्टिस्टेट पतसंस्थेचे सल्लागार सलीम इनामदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते .

[ चौकट – ॲक्युप्रेशर , ॲक्युपंक्चर व सु – जोक थेरेपी ही अत्यंत प्राचीन असून चीन, जपान , कोरिया व इतर देश्यांमध्ये या थेरेपी ला शासकीय मान्यता मिळालेली आहे . ही थेरेपी अतिशय सोपी व सुटसुटीत असून कोणताही साईड इफेक्ट नसल्याने आपल्या शरीरातील दुखणाऱ्या अचूक बिंदूवर दाब देऊन किंवा मायक्रो निडल्स टोचून त्यामध्ये हालकसा विद्युत प्रवाह सोडून जो रक्त प्रवाहाला अडथळा येतो , तो दूर केला जातो . यामुळे रुग्णाला होणाऱ्या वेदना कमी होतात व त्या व्याधीतून मुक्ती मिळते , असे ही ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर तज्ञ अशोक खोसे यांनी सांगितले . ]
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close