क्राइम

दत्तक मुलीकडून आईची सुपारी देऊन हत्या

Spread the love
१२ लाखांत प्रियकर आणि त्याच्या मित्राला दिली सुपारी
आईची हत्या केल्यानंतर मुलगी खात होती चायनीज आणि मिठाई 

रांची / विशेष प्रतिनिधी

                       सहा महिन्यांची असताना दत्तक घेतलेल्या मुलीने प्रियकर आणि त्याच्या मित्राला  १२ लाखात सुपारी देऊन संपल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे असेे कौर्य केल्यानंतर मुलगी घरात ऑनलाइन चायनिज आणि मिठाई खात बसली होती.

नाहिदा परवीन या आपल्या १७ वर्षीय दत्तक मुलीसोबत मणि टोला भागात राहत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. ते वीज विभागात कार्यरत होते. पतीच्या निधनानंतर नाहिदा यांना सुमारे ४५ लाख रुपये आणि पेन्शन मिळत होती. हीच रक्कम आणि मालमत्ता हडपण्यासाठी मुलीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आईच्या हत्येचा कट रचला.

१२ लाखांची सुपारी आणि हत्येचा कट

मिळालेल्या माहितीनुसार, नाहिदा यांच्या मुलीचे अरबाज नावाच्या तरुणावर प्रेम होते. नाहिदा यांचा या प्रेमसंबंधांना विरोध होता, कारण मुलगी पेन्शनचे पैसे प्रियकराला देत असे. या वादातून मुलीने प्रियकर अरबाज आणि समीर खान नावाच्या साथीदाराला १२ लाख रुपयांची सुपारी देऊन आईची हत्या करायला सांगितली. शुक्रवारी रात्री नाहिदा यांना घरात बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली.

पुराव्यांची विल्हेवाट आणि बाथरूमची अफवा

आईचा मृत्यू झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मुलीने मृतदेह घरातील डीप फ्रीजरमध्ये ठेवला. त्यानंतर नातेवाईकांना फोन करून आई बाथरूममध्ये पडून मरण पावली, अशी खोटी माहिती दिली. नातेवाईकांनीही तिच्यावर विश्वास ठेवून रविवारी मृतदेहाचे दफन केले.

नाहिदा यांचे काही नातेवाईक उत्तर प्रदेशातून आले होते. त्यांनी दफन करण्यापूर्वी नाहिदा यांच्या गळ्यावर जखमेचे निशाण आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा पाहिल्या होत्या. संशय बळावल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व सत्य सांगितले.

दफन केलेला मृतदेह बाहेर काढला

सत्य समोर आल्यानंतर दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाहिदा यांचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

अंगावर काटा आणणारे क्रौर्य

नाहिदा यांनी ज्या मुलीला अवघ्या ६ महिन्यांची असताना दत्तक घेतले होते, तिचे क्रौर्य पाहून शेजारीही अवाक झाले आहेत. ज्यावेळी घरात आईचा मृतदेह पडलेला होता, त्यावेळी ही मुलगी बाहेरून जेवण मागवून खात होती. पोलिसांनी आतापर्यंत प्रियकर अरबाज आणि समीरला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close