महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनामार्फत दिनांक 30 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन
विविध मागण्यांसाठी मुद्रांक विक्रेत्या संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा( प्रतिनिधी )-महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनामार्फत दिनांक 30 ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या एक दिवसीय काम बंद आंदोलनामध्ये सामील होण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व दुय्यम निबंधक भंडारा यांना महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनेच्या वतीने दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी निवेदन सादर करण्यात आले.
भंडारा : जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखक मागील अनेक वर्षांपासून शासनाचे कर्तव्य पार पडत आहेत. मात्र मागील काही दिवसाअगोदर मीडिया आणि न्यूज पेपरच्या माध्यमातून असे लक्षात आले की, 100 व 500 रुपयांचा मुद्रांक हे संपुष्टात आणण्याकरिता प्रस्ताव दाखल झालेली आहेत. तो प्रस्ताव पारित झाला असेल तर अनेक मुद्रांक विक्रेता आणि दस्त लेखक यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. आणि त्यांचेवर अवलंबून असलेले व्यक्ती परिवार त्यांचे मुले बाळे यांच्यावर देखील उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे तब्बल या व्यवसायावर 4500 ते 5000 मुद्रांक विक्रेत्या आणि त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहेत. त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ येईल. करीता 100 आणि 500 मुद्रांक विक्री बंद करू नये तसेच आम्हाला बेरोजगार करू नये. याकरिता दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी एक दिवस मुद्रांक विक्री आणि दस्त लेखन बंद करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार भंडारा तसेच दुय्यम निबंधक भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव, जनसेवक पवन मस्के, मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक नरेंद्र रामटेके, विलास धांडे, राजू बनसोड, हर्षवर्धन गोस्वामी, दिनेश मडामे, मायावती सुखदेवे, रणजीत कोटांगले, प्रदीप हाडगे, जे एस दहिवले, चंद्रशेखर मरस्कोल्हे, राजीक सय्यद, योगेश मेश्राम, जौसीक सय्यद, सुचिता बनसोड, विनोद वासनिक, ओमप्रकाश गोंडाने, सतीश कुमार नागदेवे, कुमार मंगल बनसोड, डी.डी. मस्के, शशिकांत नागदेवे आणि अनेक मान्यवर तसेच संघटनेचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.