स्विमिंग पूल मध्ये लोक5 घेत होते पोहण्याचा आनंद आणि तितक्यात आला वाघ
सोशल मीडिया हे एखादी घटना घडताच तिला पब्लिक पर्यंत पोहचवण्याचे सगळ्यात सोपा प्लॅटफॉर्म झाला आहे. कुठली घटना घडली नाही की ती लगेच समाज माध्यमांवर दिसते. या घटनेबद्दल सांगायचे झाल्यास काही लोकं स्विमिंग पूल मध्ये धिंगामस्ती करत असताना तेथे सिंह येतो . त्याच्याकडे यापैकी कोणाचे त्याच्या कडे लक्ष जाते आणि एकच कल्लोळ माजतो. स्विमिंग पुलमध्ये खेळणारे जीव वाचवण्यासाठी बाहेर पडतात. वास्तविक वाघाने कोणाला त्रास दिला नाही.पण वाघ तो वाघच त्यामुळे सगळे भिले होते.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?
सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. प्रत्येक जण त्यांचे फोटो क्लिक करत आहे. त्यानंतर एका व्यक्तीने मागे वळून पाहिले तर त्याच जलतरण तलावात एक वाघही पोहत असल्याचे त्याला दिसते. वाघाला पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसतो. तो जोरात ओरडतो अन् सर्वांचे लक्ष वाघाकडे जाते. जसे सर्वांचे वाघाकडे लक्ष जाते, तेव्हा सर्वांचाच थरकाप उडतो. त्यामुळे प्रत्येक जण जमेल तितक्या लवकर स्विमिंग पूलच्या बाहेर पडू लागतो. वाघाला बघून काही लोकांची तर प्रकृती बिघडते, जी व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारा वाघ हा पाळीव प्राणी असल्याचे दिसते, कारण त्याने कोणावरही हल्ला केला नाही आणि हा पूलही घरात बांधला आहे, त्यामुळे तेथे फक्त पाळीव प्राणी येऊ शकतो. व्हिडीओमध्ये दिसणारा वाघ पाळीव असल्यामुळे तो कोणालाही इजा करत नाही मात्र, वाघ हा पाळीव असला तरीही त्याला पाहून पूलमध्ये मस्ती करणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.