सामाजिक

शिरसगाव कसबा येथील शासकीय दुकानात गुढीपाडवा व आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाचा आनंदाचा शिधा वाटपाला प्रचंड प्रतिसाद

Spread the love
प्रतिनिधी मुबीन शेख
. शिरजगाव कसबा.
 शिरजगाव कसबा.महाराष्ट्रातील पुन्हा सत्तेत आलेल्या  भाजप- शिवसेना युती सरकारने सर्वसामान्य  जनतेला दिवाळीपासून  सुरुवात केलेल्या ‘आनंदाचा शिधा ‘ वाटप  हा अभिनव  उपक्रम आज  महागाई काळामध्ये सर्वसामान्य जनतेला आधार देणारा ठरत असून महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाबद्दल जनतेमध्ये लोकप्रियता वाढलेली आहे  महाराष्ट्र शासनाने अवघ्या १००  रुपयांमध्ये    साखर, रवा ,चनाडाळ आणि तेल प्रत्येक   एक किलो प्रमाणे राज्यातील सर्व शासकीय धान्य दुकानातून पुन्हा गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा  वाटप करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यातील  चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील एकूण ७ शासकीय धान्य वाटप दुकानांमध्ये  जवळपास  ३४०० केसरी व पिवळ्या रंगाच्या राशन कार्ड धारक कुटुंब लाभार्थ्यांना   आनंदाचा शिधा मधील महाराष्ट्र शासनाकडून सर्व साहित्य उपलब्ध झाले असून गावातील  लाभार्थी कुटुंबाला वाटप करण्यात येत असल्याची  माहिती गावातील  सर्व शासकीय धान्य दुकान संचालक यांनी माध्यमाला दिली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close